पुणो : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी, डावे, आंबेडकरवादी, मार्क्सवादी विचारांच्या सर्व पक्षांना एकत्र आणून महाआघाडी उभारण्याची चर्चा असून, लवकरच ती प्रत्यक्षात येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत लोकभारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी दिली.
डावी आघाडी आणि महाराष्ट्र लोकशाही समिती यांना सोबत घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी राजकीय पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत सुरू असलेल्या हालचालींची माहिती पाटील यांनी दिली. या वेळी सोशालिस्ट पार्टीचे नेते डॉ.अभिजित वैद्य, जनता दलाचे प्रताप होगाडे, अॅड. संतोष म्हस्के उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘‘धर्मनिरपेक्षते समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे, त्यामुळे भाबडेपणा सोडून त्याविरोधात पुरोगामी पक्षांनी एकत्र येण्याची
गरज आहे.’’(प्रतिनिधी)
नवमध्यमवर्गाला
आकर्षित करणार
वंचितांबरोबरच नवमध्यमवर्गाला आकर्षित करण्यावर यापुढे भर देण्यात येणार आहे. वंचितांपुढे दररोजच्या रोजीरोटीचा प्रश्न असतो, तर o्रीमंत हे आणखी संपत्ती मिळविण्याच्या मागे लागलेले असतात. त्यामुळे मध्यवर्गीयांवर मोठी जबाबदारी येऊन पडते. या वर्गाला आमच्या सोबत घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अभिजित वैद्य यांनी सांगितले.
मोदींकडून साफ निराशा
शिक्षकदिनानिमित्त मोठा गाजावाजा करून झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण शिक्षकांकरिता साफ निराशा करणारे असल्याची प्रतिक्रिया शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली. मोदींनी शिक्षकांना सन्मान देणारी एकही घोषणा केली नाही.