श्रीपूर : सेनापती मैदान सोडून चालला तर खालचे सैनिक कसे लढणार? शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्यामुळे त्यांच्या सैनिकांचे मनोधैर्य खचल्याची टीका सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.बुधवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी माळशिरस तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत बैठका घेतल्या. शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधून कौटुंबिक कारण पुढे करून माघार घेतली आहे हे सत्य नसून, माढा मतदारसंघामध्ये त्यांचा पराजय निश्चित होता हे त्यांना समजल्यावर त्यांनी माघार घेतली आहे़ त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सेनापतीने माघार घेतल्याने सैनिकांचे मनोधैर्य खचले आहे. सहकारमंत्री, पालकमंत्री एकाच दिवशी तालुक्यातसहकारमंत्री तालुक्यामध्ये गावभेटी घेऊन कार्यकर्त्यांचे संपर्क साधत होते़ त्याच दिवशी पालकमंत्री विजयकुमार देशमुख सोलापूरमधील भाजपचे नगरसेवक व कार्यकर्ते घेऊन पांडुरंग कारखान्यावर स्नेहभोजनाचा आस्वाद घेत होते़ त्यावेळी आ़ प्रशांत परिचारक व विजयकुमार देशमुख यांची बंद खोलीमध्ये राजकीय घडामोडींवर बराच वेळ चर्चा झाली़ पण या चर्चेत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही़
सेनापतीनेच माघार घेतल्याने खचले सैनिकांचे मनोधैर्य; सुभाष देशमुखांची पवारांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 6:56 AM