अकोला : राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या १0२ व्या जयंतीनिमित्त आयोजित कृषिदिन कार्यक्रमात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या विदर्भातील अकरा प्रगतिशील शेतकर्यांचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. स्व. नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १ जुलै रोजी कृषिदिन साजरा केला जातो. यानिमित्त कृषी विद्यापीठात कृषी प्रबोधनासह राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त करणार्या शेतकर्यांचा सत्कार करण्यात येत असतो. यंदाही कृषी विद्यापीठाच्या कमेटी सभागृहात सकाळी ११ वाजता शेतकर्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. राज्य शासन पुरस्कारप्राप्त शेतकरी गजानन कळंबे, बानसी ता. पुसद (यवतमाळ), ज्योती पागधुने, गोर्धा ता. तेल्हारा (अकोला), प्रदीप तेलखेडे, बहाद्दरपूर ता. भातकुली (अमरावती), चोपराम कापगते, सिंदीपार ता. सडक अर्जुनी (गोंदिया), नागोराव टोंगे, धामणा लिंगा (नागपूर), कुंजीलाल कुंभरे, उसरीपार ता. रामटेक (नागपूर), शिवदास कोरे, किरमिटी मेंढा ता. नागभिड (चंद्रपूर), जिजाबाई बोरकर, जाटलापूर ता. सिंदेवाई (चंद्रपूर), महादेव भोयर, सोयता (वाशिम),नितीन इंगोले, कोंडाळा झामरे (वाशिम), ज्ञानेश्वर गायकवाड, गिरडा (बुलडाणा) यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
विदर्भातील प्रगतिशील शेतक-यांचा होणार सत्कार
By admin | Published: June 25, 2015 11:54 PM