ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांच्या कत्तलीचा परवाना नसेल तर मुंबईमध्ये अशा कत्तलीस मनाई असल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. बकरी ईदच्या दिवशी बळी देण्याच्या संदर्भातही मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन अॅक्ट, 1888 नुसार कायद्याचं पालन करावं लागणार आहे. भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदेच्या याचिकेसंदर्भात मुंबई हायकोर्टाने सदर आदेश दिला आहे. त्यामुळे प्राण्यांची कत्तल करण्याचा परवाना नसेल तर अशा कत्तली बेकायदेशीर असतील आणि त्यांना बंदी असेल असे स्पष्ट झाले आहे.