लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: कोरोना असलेल्या रुग्णांना डायलिसिस सेवा मिळण्यास अडचण येत असल्याच्या घटना मागील काही दिवसांत समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई नेफ्रोलॉजी ग्रुप आणि आयआयटी मुंबई येथील अभियत्यांनी एकत्र येऊन डायलिसिस आवश्यक असणारे रुग्ण व डायलिसिस व्यवस्था यांचे व्यवस्थापन करणारी प्रणाली विकसित केली आहे.
ज्यावेळी डायलिसिस केंद्रांना नवीन कोरोना बाधित रुग्ण किंवा संशयित कोरोना बाधित रुग्ण आढळून येतो तेव्हा त्या रुग्णाचा तपशील या प्रणालीमध्ये समाविष्ट केला जातो. याच प्रणालीमध्ये प्रत्येक डायलिसिस केंद्र हे त्यांच्याकडे कोरोना बाधितांसाठी असलेल्या डायलिसिस संयंत्राची उपलब्धता नोंदवत असतात. यामुळे ज्या बाधितास डायलसिस संयंत्राची गरज असते, त्यावेळेस उपलब्ध केंद्रांमध्ये त्यांच्यासाठी ही सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी मध्यवर्ती वैद्यकीय समन्वयकांच्या महत्त्वाची भूमिका बजावतात.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार, मुंबई महानगरपालिकेत असलेल्या सर्व डायलिसिस केंद्राना त्यांची रुग्ण हाताळणीची क्षमता तसे, त्यांच्याकडे येत असलेल्या कोविड बाधित व संशयित रुग्णांची माहिती या प्रणालीत नोंदविणे बंधनकारक आहे. जेणेकरुन व्यवस्थापन प्रभावीपणे करता यावे.
या प्रणालीचा आता विस्तार करुन त्यात डायलसिस उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करुन देणे, पालिकेच्या विशेष वाहनांमधून या रुग्णांना निर्देशित उपचार केंद्रांमध्ये नेणे आदी बाबींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे, पालिकेने सेव्हन हिल्स, बाळासाहेब ठाकरे ग्णलाय, नायर रुग्णालयांमध्येही डायलिसिस सेवाही सुरु केली आहे.नोंदणीकृत डायलिसिस केंद्रांची संख्या - १६८च्कोरोनाबाधित डायलिसिस रुग्णांना सेवा देत असलेल्या केंद्राची संख्या - १७च्कोरोना संशयित डायलिसिस रुग्णांना सेवा देत असलेल्या केंद्राची संख्या- २च्डायलिसिस संयत्रांची सध्याची संख्या - १०५ (बृहन्मुंबई व शासन- ८०, खाजगी -२५)नोंदणी झालेले एकूण रुग्ण- ३७३च्संयंत्र नेमून दिलेले कोविड बाधित रुग्ण- ३३२