शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

राज्यातील प्रकल्प ‘ट्रॅकवर’

By admin | Published: February 02, 2017 12:06 AM

राज्यातील रेल्वे प्रकल्प आता ‘ट्रॅकवर’ येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीच्या मंजुर तसेच सुरु असलेल्या प्रकल्पांसाठी ५ हजार ९५८ कोटी रुपयांच्या खर्चाला रेल्वे अर्थसंकल्पातून

मुंबई : राज्यातील रेल्वे प्रकल्प आता ‘ट्रॅकवर’ येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीच्या मंजुर तसेच सुरु असलेल्या प्रकल्पांसाठी ५ हजार ९५८ कोटी रुपयांच्या खर्चाला रेल्वे अर्थसंकल्पातून मंजुरी देण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे गेल्या दोन वर्षात भरीव तरतुद महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी करण्यात आल्याचा दावा मध्य आणि पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांकडून करण्यात आला आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्पांचा विकास, प्रकल्पांना गती मिळावी, त्याची अंमलबजावणी आणि व्यवहार्यता तपासणे, प्रकल्प क्षमतेत वाढ करणे, रेल्वे प्रकल्प दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण व्हावेत आणि भूसंपादन झाल्यानंतर प्रकल्पबाधितांना मदत देतानाच त्यांचे पुनर्वसन त्वरित व्हावे यासाठी राज्य शासनाकडून महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा या नावाने महामंडळ स्थापन करण्यास नुकतीच मंजुरी दिली. त्यामुळे प्रकल्पांना राज्य शासनाकडून गती दिली जात असतानाच केंद्राकडूनही राज्यातील प्रकल्पांसाठी आर्थिक बळ दिले जात आहे. बुधवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वे प्रकल्पांच्या कामांसाठी ५ हजार ९५८ कोटी रुपयांचा खर्चाला मंजुरी देण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी मोठा निधी दिला जात असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा आणि पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक जी.सी.अग्रवाल यांनी सांगितले. २00९-१४ पर्यंत १ हजार १७१ कोटी रुपये देण्यात आले होते. २0१४-१६ मध्ये प्रत्येक वर्षी ३ हजार ५८६ कोटी रुपये मंजुर झाले. दोन वर्षात चांगली वाढ देतानाच २00९ पासून पाहिल्यास जवळपास ४0८ टक्के वाढीव मदत देण्यात आल्याचे सांगितले. राज्यातील प्रकल्पांबरोबरच यात मुंबईतीलही काही प्रकल्प आहे.