कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यासंबंधी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने दोषारोप दाखल करण्यास २७ आॅक्टोबरपर्यंत स्थगिती दिल्याने ही सुनावणी ५ नोव्हेंबरला होईल, असे न्यायाधीश बिले यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बुधवारी दुसरा संशयित वीरेंद्र तावडे याच्या न्यायालयीन कोठडी बुधवारी संपत आहे. त्यावर सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर उद्यासुनावणी होणार आहे. पानसरे हत्या प्रकरणी संशयित गायकवाडच्याविरोधात ‘एसआयटी’ने दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे. दोषारोपपत्र दाखल करण्यास उच्च न्यायालयाने उद्या, गुरुवारपर्यंत स्थगिती दिली आहे. तर याच खटल्यातील दुसरा संशयित आरोपी वीरेंद्र तावडे सध्या येरवडा कारागृहात आहे. त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज, बुधवारी संपत आहे. या सुनावणीसह आरोपीचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर व समीर पटवर्धन यांनी पोलिसांविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. त्याच्या अंतिम निकालाची सुनावणी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या दालनात होत आहे. (प्रतिनिधी)
समीर गायकवाडवरील आरोपनिश्चिती लांबणीवर
By admin | Published: October 26, 2016 1:43 AM