सोमेश्वरनगर: अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो. मग कितीही किंमत मोजावी लागली तरी तो पाळतो. हर्षवर्धन पाटील खोटे आरोप करत आहेत. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असा शब्द दिला होता. पण त्यांचे आधीचं ठरलं होतं. त्यांना जायचंच होतं, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. सोमेश्वरनगर येथे सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विज्ञान महाविद्यालय, मुलींच्या वसतिगृह भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. पवार म्हणाले, आम्ही हर्षवर्धन पाटील यांना ५० ते ५५ फोन केले पण ते भेटले नाहीत. सांगायला काही नाही म्हणून ते आता राष्ट्रवादीवर आरोप करत आहेत, मी स्वत: कित्तेक वेळा त्यांना पुण्याच्या घरी भेटायला गेलो. पण सध्या ते फक्त पावती फेडायचे काम करत आहेत. पवार म्हणाले, गेल्या पाच वर्षापासून राष्ट्रवाद चा मुद्दा पुढे केला जात आहे. ३७० बद्दल बोलले जातेय. पण कंपन्या बंद पडत आहेत, समाजातील प्रत्येक घटक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आहे. त्यांच्याकडे ढुंकून पाहिलं जात नाही. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी मिळत नाही. लोकांना भावनिक बनवलं जातेय. काहींना भीती दाखवून तर काहींना नोटिसा पाठवून पक्षात घेतलं जातेय. त्यांना सत्तेचा माज, सत्तेची नशा चढली आहे.
ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरे बोलायचे कमी झाले : पवार'सत्ताधारी पक्ष पैशांची आणि विविध चौकशांची भीती दाखवत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी चौकशी झाल्यापासून तेही बोलायचे कमी झाले आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.