पुणो : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना फक्त 13 दिवसांचाच अवधी मिळणार असल्याने कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांर्पयत पोहोचण्याचे आव्हान त्यांच्यापुढे उभे ठाकणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 2क् सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे. 27 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 1 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. 15 ऑक्टोबरला मतदान आहे. निवडणुकीचे हे वेळापत्रक लक्षात घेतले, तर फक्त 13 दिवसच उमेदवारांना त्यांच्या प्रचारासाठी मिळतात. मतदारसंघाची व्याप्ती आणि मतदारांची संख्या लक्षात घेतली, तर इतक्या कमी वेळेत त्यांच्यार्पयत पोहोचणो उमेदवारांसाठी अवघड काम आहे. अद्याप आघाडी आणि युतीचे जागावाटपच झालेले नाही. ते झाल्यानंतर प्रचारात रंगत येईल. विशेष म्हणजे, प्रचाराचा काळ हा नवरात्रोत्सवाचा आहे. त्यामुळे मतदारही उमेदवारांना कितपत भेटू शकतील हा प्रश्नच आहे. प्रत्येक मतदारसंघातील गल्लीबोळंत नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. त्यात त्या भागातील युवक सहभागी होतात. अशा वेळी प्रचार यात्र किंवा प्रचार मिरवणुका काढल्या तरी त्याला मतदारांचा आणि त्या भागातील युवकांचा किती सहभाग मिळू शकतो, हा प्रश्नच आहे. नवरात्र महोत्सवात आचारसंहितेमुळे थेट सहभाग नोंदवता येणार नसला, तरी आर्थिक पाठबळ मंडळाच्या मागे उभे करून उमेदवार संबंधित मंडळाच्या कार्यकत्र्याचा प्रचारासाठी उपयोग होऊ शकतो.
दस:याच्याच दरम्यान किंवा दिवाळीच्या आधी शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा घेतल्या जातात. दिवाळीच्या आधी महाविद्यालयांना सुटय़ा लागतात. या काळात अनेक कुटुंबे बाहेरगावी जातात. याचाही फटका प्रचाराला बसू शकतो. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका आहेत. त्यामुळे राज्यस्तरावरील किंवा केंद्रस्तरावरील स्टार प्रचारकांचे निवडणूक दौरे आयोजित करणोही कठीण होणार आहे. दोन टप्प्यांत निवडणुका झाल्या असत्या, तर त्यानुसार नियोजन करणो सोपे होते. मात्र, एकाच वेळी संपूर्ण राज्यात नेत्यांना प्रचारासाठी फिरावे लागेल. केंद्रीय नेत्यांचीही या कामात कसोटी लागणार आहे.