शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

प्रचारफेरी

By admin | Published: February 18, 2017 1:58 AM

विदर्भवीर आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींचे भाषण म्हणजे, आकड्यांचा खेळ आणि शब्दांची नागपुरी भेळ. नितीनभौ, तसेही आरपार बोलण्याबद्दल प्रसिद्ध.

नितीनभौ लई भारी!विदर्भवीर आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींचे भाषण म्हणजे, आकड्यांचा खेळ आणि शब्दांची नागपुरी भेळ. नितीनभौ, तसेही आरपार बोलण्याबद्दल प्रसिद्ध. कोणाची भीडभाड, मुलाहिजा आणि तमा न बाळगता दे धडक, बेधडक बोलून मोकळे होतात. विशेषत: राजकारणी, अधिकारी आणि पत्रकार हे तर त्यांची खास गिऱ्हाईकं. त्यामुळे नितीनभौचं भाषण म्हटलं की, सगळ्यांचेच कान टवकारले जातात. मुंबई महापालिकेच्या रणसंग्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटेच किल्ला लढवित होते. त्यामुळे नितीनभौ कुठंय, अशी विचारणा होत होती. शेवटी काल पार्ल्यात त्यांची सभा झाली. ‘पैसा कमावणं हा काही गुन्हा नाही, पण राजकारण हा पैसे कमावण्याचा मार्ग नाही. मी फोकनाड नाही, नुसती घोषणा करत नाही तर कामं पण करतो.’ असं नितीनभौ यांनी सांगताच पार्लेकर मंडळींमध्ये कानकुन सुरू झाली. ‘फोकनाड म्हणजे काय हो?’ असं प्रत्येकजण एकमेकांना विचारत होता. तेवढ्यात भौ नी दुसरा टाकला, ‘टक्क्यानंच मुंबईचा घात केला!’ नितीनभौंच्या शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी पार्लेकर मंडळी कालपासून डिक्सनरी घेऊन बसलेत म्हणे!रावसाहेबांचा जावईशोध!विख्यात अर्थतज्ज्ञ, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि सलग दहा वर्ष देशाचे पंतप्रधानपद भूषविलेले डॉ. मनमोहन सिंग यांना कोणी ओळखत नव्हते, असा जावईशोध भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लावला आहे. रावसाहेब तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर पुढे म्हणाले, भारत हा देश आहे, हे नरेंद्र मोदींमुळेच जगाला कळले! आपल्या अशा बोलभांडपणामुळे दानवे यापूर्वी अडचणीतही आलेले आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत त्यांनी मतदारांना ‘लक्ष्मीदर्शन’ घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती. त्यामुळे किमान आतातरी ते सांभाळून बोलतील अशी अपेक्षा होती. पण रावसाहेबांना कोण अडविणार? तसेही ते जालना जिल्ह्यात ‘चकवा’ म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे ते कधीकोणाला चकवा देतील, याचा थांगपत्ता लागत नाही. कदाचित त्यांच्या या गुणविशेषामुळेच त्यांना अमित शहा यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली असावी! भावाची पाठराखणराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे संवेदनशील युवानेत्या म्हणून ओळखल्या जातात, तर त्यांचे चुलतबंधू अजितदादा यांचा स्वभाव नेमका उलट. ठाकरे, मुंडे, मोहिते आदी राजकीय घराण्यांमध्ये भाऊबंदकी झाली असली तरी बारामतीचे पवार घराणे मात्र त्यास अपवाद ठरले. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार,सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय आहेत. आता तिसरी पिढीही राजकारणात येऊ घातली आहे. शरद पवारांचा राजकीय वारसा नेमका कोण चालविणार, असा प्रश्न जेव्हा उपस्थित केला जातो, त्यावेळी ‘आम्ही दोघंही’ असं उत्तर सुप्रियाताई देतात. त्यावरून त्यांच्यातील ‘अंडरस्टँडिंग’ दिसून येतं. अजितदादांवर ज्यावेळी आरोप झाले, त्यावेळी सुप्रिया यांनीच त्यांची पाठराखण केली. परवा त्यांना दादांच्या स्वभावाबद्दल छेडलं असता, माझ्या भावाला तुम्ही ओळखलंच नाहीत. दादा माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल आहे. लोक उगीच गैरसमज पसरवितात. स्पष्टवक्तेपणा आणि फटकळपणा, यातील फरकच काही लोकांना कळत नाही.एवढंच काय, मुंबईत आम्ही पक्षसंघटना बांधण्यात कमी पडलो, अशी कबुलीही दिली. मागे एकदा भाषणात त्यांनी ‘मी नागिण आहे, माझ्या वाट्याला जाऊ नका’, असा इशारा दिला होता. त्यावर त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री कुंडल्या काढणार म्हणाले होते, त्यावेळी भाषणाच्या ओघात नागिन असं संबोधलं. मुख्यमंत्री माझी कुंडली काढणार असतील, तर मी नाही ऐकून घेणार !