ऑनलाइन लोकमतपिंपरी, दि. 19 - महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काळुराम पवार आणि भाजपाचे शैलेश मोरे यांच्यात हाणामारी झाली. त्याचे समर्थक एकमेकांवर चाल करून गेले. त्यात दोन जण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री ही घटना घडली. उमेदवार पवार याच्याविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर मोरे याच्यावर दंगा घडवुन आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री दोन गटात चिंचवड येथे धमश्चक्री झाली. दोन्ही उमेदवारांमध्ये वादंग झाले. त्यांचे समर्थक एकमेकाशी भिडले. तलवारीचे वार केल्याने दोन जण जखमी झाले. त्यांना वायसीएम रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार असल्याने गुन्हा दाखल करण्यास रात्री उशीर झाला. या प्रभागात ऐन निवडणुकीत काहीही घडू शकते. अशी शक्यता निर्माण झाली आहे. संवेदनशील प्रभाग असल्याने पोलिसांनी बंदोबस्ताची अधिक दक्षता घेतली आहे
प्रचारात हाणामारी, दोन उमेदवारांवर गुन्हे दाखल
By admin | Published: February 19, 2017 1:12 PM