शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

आता मिळणार प्रॉपर्टी कार्ड

By admin | Published: April 27, 2016 1:42 AM

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने दहा गावांमध्ये नवनगर विकसित करण्यात आले.

निगडी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने दहा गावांमध्ये नवनगर विकसित करण्यात आले. मात्र, कागदपत्रांचे अद्ययावतीकरण करण्यात प्राधिकरण पिछाडीवर राहिले. महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाते. प्राधिकरणातील रहिवाशांना याबाबतची सोय नव्हती. प्राधिकरणवासीयांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सेक्टर तीनपासून त्याची सुरुवात होणार असून, अन्य पेठांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ शहरातील दोन लाख रहिवाशांना होणार आहे.औद्योगिकीकरणाचा विकास झाल्यानंतर कामगार कष्टकरी वर्गाच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली. या संस्थेस ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. प्राधिकरणाने ४ हजार ३२३ हेक्टर क्षेत्र प्राधिकरणाने ताब्यात घ्यायचे ठरवले. त्यापैकी संपादनाखाली २५८४ हेक्टर क्षेत्र असून प्रत्यक्ष ताब्यात आलेले क्षेत्र १७७१ हेक्टर आहे, त्यापैकी १३२५ हेक्टर क्षेत्र विकसित केले आहे. सुरुवातीला एकूण ४२ पेठांचे नियोजन केले. त्यापैकी अनेक पेठा विकसित झालेल्या नाहीत. अनेक पेठांवर अतिक्रमणे झाली आहेत. प्राधिकरणाकडे उपलब्ध असणारी यंत्रणा आणि वेळोवेळी कार्यालयाचे झालेले स्थलांतर यामुळे प्राधिकरणाच्या बहुतांश क्षेत्रांचे नकाशे, सीमांकनाची कागदपत्रे वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सदनिका किंवा प्लॉटधारकांना येथे विविध कामांसाठी खेट्या माराव्या लागतात. या संदर्भातील माहितीसाठी प्राधिकरणाचे अध्यक्ष दिलीप बंड असताना शाश्वत प्रकल्प सुरू केला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. प्राधिकरणाने आजवर ३४ गृहयोजना राबविल्या असून, बांधकाम केलेल्या सदनिकांची संख्या ११ हजार २२१ आहेत. तसेच वाणिज्य प्रयोजनाचे गाळे, २३१ असून ४५ भाजी विक्रीचे ओटे तयार केले आहेत. तर एकूण ६९७९ निवासी भूखंड आणि ७०५ व्यापारी आणि औद्योगिक भूखंडांची विक्री केली आहे. (वार्ताहर)