शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

नवी मुंबईत ६८१ कोटींचा मालमत्ता कर घोटाळा

By admin | Published: January 26, 2017 4:41 AM

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील ६८१ कोटी, ६ लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी आयुक्त तुकाराम मुंढे

नवी मुंबई : महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील ६८१ कोटी, ६ लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने निलंबित मुख्य कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २० वर्षांत २६१८ एलयूसी (मोकळे भूखंड) मालमत्ताधारकांना बिलांचे वाटप न केल्यामुळे व कर वसूल न केल्याने पालिकेचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रकाश कुलकर्णी यांच्यासह दिनेश गवारी व किशोर ढोले यांचा समावेश आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २ मे २०१६ रोजी पदभार स्वीकारण्यापूर्वीच मालमत्ता कर विभागाला भेट देऊन तेथील बेशिस्त कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली होती. मालमत्ता कर विभागाची वसुली व करआकारणीचा आढावा घेतल्याने अनियमितता आढळून आल्याने विभागाचे प्रमुख प्रकाश कुलकर्णी यांना २५ मे २०१६ रोजी निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केली होती. लेखा परीक्षकाकडून पालिकेच्या स्थापनेपासूनचे व्यवहार तपासले असता ३३०१ एलयूसी मालमत्ताधारकांपैकी २६१८ मालमत्तांना २० वर्षांमध्ये बिले पाठविण्यात आली नाहीत व त्यांच्याकडून वसूल केली नसल्याने पालिकेचे ६८१ कोटी ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे मुंढे यांनी याविषयी ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. आयुक्तांच्या तक्रारीवरून ठाणे लाचलुचपत विभागाने एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला आहे.