शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

मलनिस्सारण योजनेसाठी ६८३ कोटींचा प्रस्ताव

By admin | Published: March 08, 2016 2:38 AM

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत दुसऱ्या टप्प्यात भुयारी मलवाहिन्या टाकण्यासाठी पालिका प्रशासनाने ६८३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.

मुरलीधर भवार,  कल्याणकल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत दुसऱ्या टप्प्यात भुयारी मलवाहिन्या टाकण्यासाठी पालिका प्रशासनाने ६८३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. अटल मिशन अमृत योजनेअंतर्गत हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास लगेचच या कामाला सुरुवात होईल.पालिका हद्दीत ३० वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भुयारी गटारे व मलवाहिन्या टाकल्या होत्या. शहरात जवळपास ५० चौरस किलोमीटरच्या मलनिस्सारण वाहिन्या होत्या. त्या १५० ते ६०० मिली मीटर व्यासाच्या होत्या. या मलवाहिन्यावर साडेचार हजार मॅनहोल होते. या जुन्या मलवाहिन्या बदलून नव्या मलवाहिन्या टाकण्यासाठी पालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुर्त्थान अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला. त्यास २०१० मध्ये सरकारने मंजुरी दिली. त्यानुसार २०१० पासून मलवाहिन्या टाकणे व मलनिस्सारण सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यास सुरुवात झाली. पालिकेच्या ३० पैकी १८ सेक्टरमध्ये ४० टक्के मलवाहिन्यांचे काम झाले आहे. कल्याण पूर्व व पश्चिम आणि डोंबिवली परिसरात जवळपास ४८ किलोमीटर भुयारी गटार मलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मलनिस्सारण प्रक्रियेसाठी आठ केंद्रे तयार केली जात आहे. त्यापैकी सात केंद्रांचे काम झाले आहे. तर एकाचे काम सुरू आहे.दुुसऱ्या टप्प्यात पालिकेने केंद्र सरकारकडे प्रकल्प सादर केला होता. त्यास युपीए सरकारने तत्वत: मंजुरी दिली हेती. मात्र पालिकेने बीएसयूपी प्रकल्प पूर्ण करण्यास विलंब केल्याचे कारण देत केंद्राच्या नियोजन समितीने दुसऱ्या टप्प्याला वित्तीय मंजुरी देण्यास नकार दिला. भुयारी मलनिस्सारण प्रकल्पासोबत २४ तास पाणीपुरवठा योजनेलाही रेड सिग्नल मिळाला. त्यामुळे या योजना बारगळल्या. दरम्यानच्या काळात केंद्रात भाजपचे सरकार आले. या सरकारने जेएनएनयूआरएम योजना गुंडाळली. त्याऐवजी अटल मिशन अमृत योजना आणली. त्याअंतर्गत भुयारी मलनिस्सारणाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळविण्यासाठी पालिकेने ६८३ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. ते हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवतील.