पुणे : राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त भागातील जनावरे (गोधन) दत्तक घेण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभासदांनी स्थायी समितीकडे दिला आहे. मुंढवा येथे पालिकेच्या मालकीच्या २५ एकर जागेवर जनावरांसाठी चारा लागवड करण्यात यावी, अशी सूचनाही नगरसेवकांनी केली आहे. चारा व पाण्याअभावी जनावरांना सांभाळणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. सरकारी यंत्रणा त्याकरिता मदतीचे नियोजन करीत असली तरी ग्रामीण जनतेला सावरण्यासाठी शहरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यापार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त भागातील जनावरे दत्तक घेण्यासाठी योजना राबविण्यात यावी, असा प्रस्ताव नगरसेवक रामचंद्र कदम, मुकारी अलगुडे, राजेंद्र शिळीमकर, शंकर केमसे, श्रीकांत जगताप यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
जनावरे दत्तक घेण्याचा पुणे महापालिकेला प्रस्ताव
By admin | Published: September 12, 2015 1:59 AM