कोल्हापूर : पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या खडेखोळवाडी येथील आलिशान फार्म हाऊसवर पर्यटन केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्यासह आठ जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.कर्नाटकातील एका वजनदार मंत्र्याचा स्वीय सहायक किरणसिंग राजपूत याच्यासह कर्नाटकच्या मंत्रालयातील तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. गेल्या चार वर्षांपासून हा अवैध व्यवसाय सुरू होता. फार्म हाऊसचा मालक बाबासाहेब कोंडे, चालक टीना पंडित यांची पोलीस चौकशी करत आहेत.आप्पासाहेब रामगोंडा पाटील , मंजुनाथ प्रकाश कलगुटकी, नागराज हणमंतया, शिवनगौंडा यलाप्पागौडा पाटील (सर्व रा. बेळगाव), हेमंत गोरूर रामाईगौंडा, अरुण मल्लाप्पा मुस्लिमारी (सर्व रा. बंगळुरू) अशी अटक केलेल्या इतर आरोपींची नावे आहेत. त्यांना पन्हाळा न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. चार ठिकाणी अड्डेफार्म हाऊसच्या नावाखाली जिल्ह्यात चार ठिकाणी वेश्या व्यवसाय चालविला जात आहे. टीना पंडित संबंधित चार फार्म हाऊसवर नेटवर्क चालवत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.मामाचं गाव : खडेखोळवाडीतील केंद्र कोंडे मामाचे फार्म हाऊस म्हणून प्रसिद्ध आहे. बाबासाहेब कोंडे स्थानिक पुढारी आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत त्याचे पॅनेल निवडून आले. महाराष्ट्र व कर्नाटकात त्याच्या फार्म हाऊसची ‘मामाचं गाव’ अशी ओळख आहे.
वेश्याव्यवसायाचा कोल्हापुरात पर्दाफाश
By admin | Published: August 10, 2015 1:07 AM