लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यात दरवर्षी निर्माण होणाºया युरिया खताच्या तुटवड्यावर नियंत्रणासाठी राज्याच्या कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यात प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागाकडून या खताची संरक्षीत साठवणूक करण्याचे निर्देश ६ जुलै रोजी कृषी आयुक्तालयाने दिले असून, राज्यातील आठही विभागात मिळून ५० हजार मेट्रिक टन युरिया खताच्या संरक्षीत साठ्याचे नियोजन करण्याच्या सुचना त्यात नमूद आहेत.राज्यात दरवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना युरिया खताचा तुटवडा जाणवतो. ऐन आवश्यक वेळी हा तुटवडा निर्माण झाल्यानंतर युरिया खताची चढ्या दराने विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून करण्यात येतात. या पृष्ठभूमीवर शेतकºयांना खरीप हंगामात युरिया खताचा तुटवडा जाणवू नये म्हणून कृषी विभागाकडून या खताच्या सरंक्षीत साठाा करून ठेवण्याची योजना राबविली जात आहे. यंदा शेतकºयांना युरिया खताचा तुटवडा भासू नये म्हणून या योजनेंतर्गत राज्यात ५० हजार मेट्रिक टन युरिया खताचा संरक्षीत साठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात कोकण विभागातील पाच जिल्ह्यांत मिळून १ हजार ७०० मेट्रिक टन, नाशिक विभागातील चार जिल्हह्यात मिळून ५ हजार मेट्रिक टन, पुणे विभागातील तीन जिल्ह्यांत मिळून ४ हजार ५०० मेट्रिक टन, कोल्हापूर विभागातील तीन जिल्ह्यांत मिळून ४ हजार मेट्रिक टन, औरंगाबाद विभागातील तीन जिल्ह्यांत मिळून ६ हजार मेट्रिक टन, लातूर विभागातील पाच जिल्ह्यांत मिळून ८ हजार मेट्रिक टन, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत मिळून १२ हजार ३०० मेट्रिक टन, तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मिळून ८ हजार ५०० मेट्रिक टन युरिया खताच्या संरक्षीत साठ्याचे नियोजन आहे. या सरंक्षीत साठ्यातून शेतकºयांना पुरविण्यात येणाºया खतांबाबत शेतकºयांची तक्रार प्राप्त होणार नाही, अशी दक्षता घेण्याच्या सुचनाही कृषी आयुक्तालयाने ६ जुलै रोजीच्या पत्राद्वारे दिल्या आहेत.
राज्यात ५० हजार मेट्रिक टन युरिया खताची संरक्षीत साठवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 5:34 PM