राहुल शिंदे- पुणे : राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या शासकीय वसतिगृहावर कंत्राटी पद्धतीवर गृहपालांची नियुक्ती केली जाणार असून, शासनातर्फे ११६ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, गृहपाल पद जबाबदारीचे असल्याने या पदावर शासकीय व्यक्तीचीच नियुक्ती होणे आवश्यक आहे. मुलींच्या सुरक्षेची, आरोग्याची आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची जबाबदारी कंत्राटी व्यक्तीवर सोपवणे योग्य नाही. त्यामुळे शासन मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सुरू केलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात तसेच विभागांतर्गत पूर्वीपासून सुरू असलेल्या व सद्यस्थितीत रिक्त असणाऱ्या गृहपालपदावर मे.ब्रिक्स फॅसिलिटीज प्रा. लि. या कंपनीमार्फत आऊटसोर्सिंगद्वारे (बाह्यस्रोत) कंत्राटी पदावर महिलांची गृहपाल पदे भरावीत, असे आदेश राज्याचे समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. त्यामुळे समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्यामुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंत्राटी गृहपालांची नियुक्ती न करता शासनाने स्वत:च गृहपाल नियुक्त करावेत, अशी मागणी केली जात आहे.समाज कल्याण विभागाने कंत्राटी गृहपाल नियुक्त करण्याबाबत काढलेल्या १४ पानी पत्रात ६५ अटी -शर्ती टाकल्या आहेत. त्यानुसार कंत्राटदाराने नियुक्त केलेल्या महिला कंत्राटी गृहपाल यांना कोणत्याही वेळी कोणत्याही कारणास्तव कामावर कमी करण्याचा अधिकार हा पुरवठादारांना असेल. त्यासाठी समाज कल्याण विभागाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही शाखेचा पदवीधारक व वयाची २४ वर्षे पूर्ण केलेल्या आणि ४५ वर्षाच्या आतील महिलेची गृहपाल म्हणून नियुक्ती केली जाईल. गृहपालपद हे निवासी असेल, त्यामुळे नियुक्त .............
गृहपालपदावर राजकीय व्यक्ती नको कंत्राटी महिला गृहपालांची नियुक्ती करताना संबंधित महिला राजकीय पदावर नसावी याची कंत्राटदारांनी खात्री करावी. तसेच नियुक्तीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेतर्फे (बार्टी) नियुक्त कंत्राटी महिला गृहपालांना तीन दिवसाचे प्रशिक्षण बंधनकारक असणार आहे.........कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केलेल्या कर्मचाºयांकडून शिजविलेल्या खिचडीतून विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कंत्राटी गृहपालाकडे मुलींची सुरक्षा सोपविणे चुकीचे आहे. मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाचीच आहे. त्यामुळे या पदावर शासननियुक्त व्यक्ती असावी.- मनीषा धारणे, युवती जिल्हा समन्वयक, शिवसेना......वसतिगृहात राहणाºया विद्यार्थिनींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी एखाद्या कंत्राटी व्यक्तीवर सोपवणे योग्य होणार नाही. तसेच वसतिगृहातील मुली पालकांनाच आपल्या समस्या सांगू शकतात. त्यामुळे पालकांच्या भेटीबाबत लादलेले निर्बंध चुकीचे आहेत.- क्षितीजा होले, सचिव,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, कोथरूड......राज्यातील शासकीय वसतीगृहातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी खासगीकरणातून गृहपाल नियुक्त करण्याचा समाज कल्याण विभागाचा निर्णय अंत्यत चुकीचा आहे. कंत्राटी महिलांच्या हातात मुलींची सुरक्षितता सोपवून राज्य सरकार त्यांच्या जीवाशी खेळ करीत आहेत.- मनाली भिलारे, प्रभारी, राष्ट्रवादी युवती काँग्रेस,प्रभारी पश्चिम महाराष्ट्र....