ऑनलाइन लोकमतलातूरः, दि. 11- भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल तुर खरेदी केली तरीही रडतात साले ! असे उद्गार काल जालना येथे काढले होते. त्याचा लातूर शिवसेनेच्या वतीने गुरूवारी दुपारी शिवाजी चौकात दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारून खेटराचा हार खालून निषेध करण्यात आला. "यापुर्वी ही दानवे यांनी सरकारने कर्ज माफी दिली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची लेखी हमी द्या " असे विधान केले होते. दानवे हे शेतकरी विरोधी आहेत, त्यांना सत्तेचा माज आला आहे, अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी दानवे यांच्यावर टिका केली. ते पुढे म्हणाले की, मराठवाडत दुष्काळ नव्हता.. माञ आम्ही मुद्दाम फाडून सांगायचो कि खुप दुष्काळ आहे माणूस स्थलांतर करत आहेत... जनावरे मरत आहेत.. असे ओरडून सांगितलं म्हणून मदत मिळाली असे धक्कादायक वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी यापूर्वी केले होते. ते काय किंवा त्यांची भाजपा काय हे शेतकरी विरोधी आहेत. अशा शेतकरी विरोधी पक्षाध्यक्षाचा लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज निषेध असल्याचे ते म्हणाले. यावेळी सह संपर्क प्रमुख अभय सांळुके, जिल्हाप्रमुख नामदेव चालक अंगद पवार प्रदिप चौकटे, अमित खंडेलवाल, सुनिताताई चालक, प्रकाश होदतपुरे, नंदकुमार पवार, रमेश पाटील, प्रल्हाद पाटील, विशाल माने, संपत भंग, सुरज झुंजे , कुलदीप सुर्यवंशी, दिनेश जावळे, अमर बुरबुरे, बाबुराव शेळके, महेश सांळुके, सहसंपर्क अभय सांळुके,सोमनाथ आंग्रे, दिपक झा, अदी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
लातुरात दानवे यांच्या फोटोला जोडे मारून सेनेने केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2017 4:01 PM