मुंबई : राज्यातील सराफ बंद आंदोलन २८ व्या दिवशीही सुरुच आहे. सराफ व्यावसायिक आता रस्त्यावर उतरुन आपला रोष व्यक्त करू लागले आहेत. कोल्हापूरात पुणे - बेंगलोर महामार्गावर काळे झेंडे दाखवत निदर्शने झाली. पुण्यात रास्ता रोको झाला. तर मुंबई आणि बीड येथे रास्ता रोको करणाऱ्या सराफांवर पोलिसांनी लाठीमार केला. सराफ व्यावसायिकांची शिखर संघटना जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशनची आज (बुधवारी) मुंबईत बैठक होत असून त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. सोन्याच्या दागिने उत्पादनावर लावलेल्या एक टक्के अबकारी कराच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांचा गेले २८ दिवस देशव्यापी संप सुरू आहे. त्यामुळे जळगाव, पुणे, मुंबई येथील मुख्य सराफ बाजारासह राज्यभरातील सराफ पेठा कडकडीत बंद आहेत. सराफ व्यावसायिकांनी सायन-पनवेल महामार्गावर मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी लाठीमार करुन आंदोलकांना पांगविले त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या आंदोलनात पनवेल ते वाशी तसेच घाटकोपर, चेंबूर, मानखुर्द अशा विविध परिसरातील एक हजार सराफ व्यावसायिक सहभागी झाले होते. आंदोलनामुळे बेलापूर-सायन मार्गावरील वाहतूक खोळंबली.
सराफांची राज्यभरात निदर्शने
By admin | Published: March 30, 2016 1:06 AM