लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
उल्लेखनीय सेवांसाठी दरवर्षी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना पदके जाहीर केली जातात. यंदा ५९ जवानांना अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात राज्यातील सहा अग्निशमन जवानांचा समावेश आहे. शौर्य दाखविल्याबद्दल मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वॉरिक यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक तर पाच जवानांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक जाहीर करण्यात आले. उत्कृष्ट सेवेसाठी चार कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक, ५५ कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा पदक जाहीर करण्यात आले. १४ कर्मचाऱ्यांना नागरी संरक्षण पदक जाहीर करण्यात आले. राज्यातील चौघांचा त्यात समावेश आहे.
राज्यातील पदकप्राप्त अधिकारी
- संतोष वॉरिक (राष्ट्रपती पदक)
- किशोर घाडीगावकर, विभागीय अग्निशमन अधिकारी, अनंत धोत्रे, उप अधिकारी, मोहन तोस्कर, आघाडीचे फायरमन, मुकेश काटे, लीडिंग फायरमन आणि किरण हत्याल (गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक)
- अशोक ओलंबा, हवालदार (विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे नागरी संरक्षण पदक)
- नितीन वयचल, प्राचार्य, शिवाजी जाधव, जेलर ग्रुप -१, दीपक सावंत, सुभेदार आणि जनार्दन गोविंद वाघ, हवालदार (नागरी संरक्षण पदक)