मुंबई – संयुक्त राष्ट्र संघाकडून अलीकडेच जागतिक लोकसंख्या स्थिती रिपोर्ट २०२० जारी करण्यात आला. यात जगभरातील बालविवाहाचं प्रमाण २१ टक्के असण्यावर चिंता व्यक्त करण्यात आली. जगातील प्रत्येक ५ मुलींपैकी एका मुलीचं वयाच्या १८ वर्ष पूर्ण होण्याआधीच लग्न केले जाते. हा रिपोर्ट भारतासाठी महत्त्वाचा आहे, देशात प्रत्येक ४ मुलींपैकी एका मुलीचं १८ वर्षाआधी लग्न होतं असं सांगण्यात आलं आहे.
भारतातील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६ च्या आकडेवारीवर रिपोर्ट आहे. यात त्या भारतीय महिलांचे कौतुक करण्यात आले आहे. ज्यांनी बालविवाहसारख्या प्रथेविरोधात हिंमतीने आवाज उठवला, शिक्षणाच्या जोरावर या महिलांनी आत्मनिर्भर होऊन आपल्या जीवनाचा मार्ग शोधला आहे. या रिपोर्टमध्ये राज्यातील बीड जिल्ह्यात राहणाऱ्या सोनी या मुलीचा उल्लेख करण्यात आला. सोनीचे आई-वडील कामासाठी गावाबाहेर असतात.
सोनीने तिचा अनुभव सांगितला की, मी जेव्हा १५ वर्षाची होती त्यावेळी माझ्या काकांनी २८ वर्षाच्या युवकाशी माझं लग्न ठरवलं होतं. मी तेव्हा लहान होते, कोणतीही जबाबदारी उचलू शकत नव्हते. दुष्काळामुळे अनेक ठिकाणी मजुरांना दुसऱ्या जिल्ह्यात रोजंदारीसाठी पलायन करावं लागतं. त्यात फक्त पती-पत्नी अशा दोघांनाच कामावर ठेवलं जातं. त्यामुळे अनेकदा मजुरांच्या कुटुंबातील मुलांना त्रास सहन करावा लागतो. त्यात मुलींना सर्वाधिक त्रास होतो, त्यामुळे मुलीचं लवकर लग्न करुन तिला अधिक सुरक्षित करण्यासाठी नातेवाईक प्रयत्न करतात.
मात्र सोनीची गोष्ट वेगळी आहे, शारीरीक आणि आर्थिक सुरक्षेसाठी तिचं लग्न लावण्यात आलं. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच सोनीला तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळींनी मारहाण सुरु केली. मी बिनधास्त मनातलं सगळं काही बोलायची म्हणून मी वाईट आहे असं त्यांना वाटत असे. त्यांनी अनेकदा मला तांत्रिकाकडे नेले, भूत पळवण्याच्या नावाखाली मारहाण केली. अशातच सोनीच्या घरच्यांनीही तिला साथ दिली नाही. सोनीने हा सगळा अनुभव २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय बाल दिनी कार्यक्रमात सगळ्यांच्या समोर ठेवला.
यानंतर सोनीने मागासवर्गीय महिला विकास मंडळ संस्थेच्या मदतीनं कौशल्य विकासतंर्गत नर्सचं प्रशिक्षण घेतलं. तसेच गावातील १२ मुलींनाही तिने या उपक्रमाशी जोडलं. सध्या सोनी पूर्णपणे आत्मनिर्भर असून पुण्यातील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करते, त्याचसोबत ती समाजातील भेदभाव, मुलींवरील अन्याय यासाठी जागरुकता निर्माण करण्याचे काम करते. त्याचसोबत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते आणि कमाईच्या बळावर स्वत:चं भवितव्य सुरक्षित केले आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा मुख्यमंत्री अशोक गहलोत करणार ‘The END’?
रायगडावरील हत्ती तलाव १५० वर्षांनी भरला; छत्रपती संभाजीराजेंनी जलपूजन केलं अन् म्हणाले...
विश्व हिंदू सेनेचं आंदोलन की स्टटंबाजी?; नेपाळी सांगून ज्या युवकाचं मुंडन केलं, तो तर...
नववधू कोरोना पॉझिटिव्ह निघाली; कुटुंबातील ९ जण बाधित तर ८६ जणांना क्वारंटाईन केलं
वैद्यकीय चमत्कार! १३० दिवसांनी महिलेला मिळालं जीवदान; नर्स अन् डॉक्टरांचे मानले आभार