मुंबई : अठरा वर्षांखालील मुले असणाऱ्या सरकारी नोकरदार महिलांना दोन वर्षांपर्यंत सुटी देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांतील महिला शिक्षक आणि शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी दोन वर्षांची रजा मंजूर करण्याची मागणी शिक्षक भारतीच्या वतीने शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे पुरुष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १५ दिवसांची पॅटर्निटी लीव्ह लागू करावी, अशी मागणीही त्यांनी सचिवांना दिलेल्या पत्रात केली आहे.
महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचा-यांना संगोपन रजा द्यावी
By admin | Published: April 21, 2015 12:57 AM