शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

विद्यापीठाला तंत्रज्ञानाची जोड देणार

By admin | Published: July 09, 2015 2:31 AM

मुंबई विद्यापीठाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची ग्वाही नवे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिली. मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला.

मुंबई : मुंबई विद्यापीठाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची ग्वाही नवे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिली. मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला.देशमुख म्हणाले, की प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापक व प्राचार्य यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते संपर्कात राहतील. विद्यार्थी किंवा कर्मचाऱ्याला त्यांना भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागणार नाही. शिवाय विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, विद्यापीठाच्या ग्रंथालयातील पुस्तके, जर्नल्स आणि संशोधन प्रबंध एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे खेटे घालावे लागणार नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या डिजिटल इंडिया प्रकल्पात सामील होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात तातडीने पावले उचलली जातील, असेही ते म्हणाले. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वायफाय इंटरनेट उपलब्ध करण्यात येईल. शिवाय विद्यापीठाचे संकेतस्थळ अद्ययावत करून मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठाच्या विविध विभागांच्या परीक्षा वेगवेगळ््या वेळी होतात. कधी कधी तांत्रिक किंवा नैसर्गिक कारणास्तव त्यांच्या वेळापत्रकात बदलही होतो. मात्र त्याचा ताण विद्यापीठ कर्मचाऱ्यांवर येतो. परिणामी यापुढे सर्व परीक्षा, कार्यक्रम, उपक्रम यांचे संपूर्ण वर्षाचे पूर्वनियोजन करून ते आधीच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगतिले.