शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

चंद्रभागेसाठी वीस कोटींची तरतूद

By admin | Published: May 04, 2016 4:42 PM

नमामी चंद्रभागा ही योजना केवळ चंद्रभागा नदी स्वच्छतेची नाही तर भीमेच्या उगमस्थानापासून शुध्दीकरणाची आहे ती केवळ वीस कोटीत होत नाही तर या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी याला किती खर्च येईल

सुधीर मुनगंटीवार : प्रत्यक्ष स्वच्छतेसाठी लागेल तेवढा निधी देणारपंढरपूर : नमामी चंद्रभागा ही योजना केवळ चंद्रभागा नदी स्वच्छतेची नाही तर भीमेच्या उगमस्थानापासून शुध्दीकरणाची आहे ती केवळ वीस कोटीत होत नाही तर या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी याला किती खर्च येईल याचा अंदाज काढण्यासाठी केवळ वीस कोटी रुपयांची तरतदू करण्यात आली आहे. आराखडा तयार झाल्यावर आराखड्यात सुचविलेला शेकडो कोटींचा निधी आम्ही देऊ व चंद्रभागा शुध्द करु अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.पंढरपूर अर्बन बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी ते आज पंढरपूरात आले होते. त्यावेळी त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले त्यावेळी त्यांनी मंदिराच्या रचनेची माहिती घेतली. मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते. त्यावेळी मंदिरातच त्यांनी पत्रकारांशी छोटेखानी वार्तालाप केला.मुनगंटीवार म्हणाले की, भीमा नदीमध्ये चार महानगरपालिका २६ नगरपालिका आणि काही मोठ्या ग्रामपंचायतीचे यांच्याव्दारे दुषित पाणी कोणतेही ट्रीटमेंट न करता येथे सोडले जात आहे. त्यामुळे खुप अशुध्द झाली आहे. त्यामुळे चंद्रभागा शुध्दीकरणाच्या उपक्रम केला आहे. पुढच्या दौऱ्यात जलतज्ञांबरोबर येऊन प्रत्यक्ष आराखड्याला सुरवात करण्यात येईल.कारवाईपेक्षा सुधारणा करण्यावर भरपुणेकरांनी चंद्रभागा दुषीत केली म्हणून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे मात्र आम्ही केवळ कारवाई करत बसण्यापेक्षा सुधारणा करण्यावर भर देत आहोत. त्यामुळेच भीमाशंकर पर्वताच्या भीमेच्या उगमस्थानापासून आता स्वच्छतेची मोहिम हाती घेण्यात येणार त्यामुळे कोणी व किती नदीच प्रदुषण केले त्यांच्याव काय कारवाई यावर आमचे जास्त लक्ष नाही मात्र एकदा स्वच्छ झाल्यावर ती कायम रहावी याची मात्र दक्षता घेणार आहोत.राज्य घटनेनुसारच वेगळा विदर्भ वेगळा विदर्भ ही विदर्भातील नागरिकांची केवळ भावनी मुद्दा आहे असे नाही तीर तेथील भौगोलिक व आर्थिक विसाकाच्या मुद्द्यावर राज्यपुर्नरचना आयोगानेही त्याला संमती दिली आहे. राज्यघटनेच्या नियमावली नुसार आहे चंद्रभागा व वाळवंटाची केली पाहणीविठ्ठलाचे दर्शन झाल्यानंरत मुनगंटीवार यांनी थेट चंद्रभागा वाळवंट गाठले. दुपारच्या कडक उन्हात त्यांना महाव्दार घाटावरून पायी वाळवंटात प्रवेश केला. तेथे पुंडलिक मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी चंद्रभागेत अध्वर्यू वाहिले. त्यानंतर चालत उध्दव घाटापर्यंत फिरुन त्यांनी अधिकाऱ्यांकडून चंद्रभागेच्या स्वच्छतेची माहिती घेतली.