मुंबई : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले लंडनमधील घर खरेदी करण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे या घराच्या खरेदीबाबतची अनिश्चितता दूर झाली आहे. हे घर केंद्र सरकारने खरेदी करावे की राज्य सरकारने, असा वादाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यातच राज्याच्या वित्त विभागाने या खरेदीबाबत काही मुद्दे उपस्थित केले होते. मात्र, हे घर राज्य सरकारच खरेदी करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते. त्याची पूर्तता म्हणून पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये ४० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. डॉ. आंबेडकर हे लंडन स्कूल आॅफ एकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना या घरात राहत असत. या शिवाय, महामानव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागातर्फे समता व न्याय वर्ष साजरे केले जाणार असून त्यासाठी १२५ कोटी रुपयांची तरतूदही पुरवणी मागण्यांद्वारे करण्यात येणार आहे. या वर्षांत अनेक कार्यक्रम होणार आहेत. त्यात डॉ.आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारी राज्य यात्रा, संमेलने, सामाजिक समतेसाठी कार्यरत असलेल्यांना पुरस्कार, १५० समता केंद्रांची उभारणी, दलित मुलामुलींसाठी वसतिगृहांची उभारणी आदींचा समावेश आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी या बाबत एकूण २२५ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून लवकरच तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येईल. पहिल्या टप्प्यात १२५ कोटी रुपये देण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले. आंबेडकरांच्या घरासाठी होणार ४० कोटींची तरतूदमुंबई : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले लंडनमधील घर खरेदी करण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे या घराच्या खरेदीबाबतची अनिश्चितता दूर झाली आहे. हे घर केंद्र सरकारने खरेदी करावे की राज्य सरकारने, असा वादाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यातच राज्याच्या वित्त विभागाने या खरेदीबाबत काही मुद्दे उपस्थित केले होते. मात्र, हे घर राज्य सरकारच खरेदी करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते. त्याची पूर्तता म्हणून पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये ४० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. डॉ. आंबेडकर हे लंडन स्कूल आॅफ एकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना या घरात राहत असत. या शिवाय, महामानव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागातर्फे समता व न्याय वर्ष साजरे केले जाणार असून त्यासाठी १२५ कोटी रुपयांची तरतूदही पुरवणी मागण्यांद्वारे करण्यात येणार आहे. या वर्षांत अनेक कार्यक्रम होणार आहेत. त्यात डॉ.आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारी राज्य यात्रा, संमेलने, सामाजिक समतेसाठी कार्यरत असलेल्यांना पुरस्कार, १५० समता केंद्रांची उभारणी, दलित मुलामुलींसाठी वसतिगृहांची उभारणी आदींचा समावेश आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी या बाबत एकूण २२५ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून लवकरच तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येईल. पहिल्या टप्प्यात १२५ कोटी रुपये देण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागाच्या पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) दिलेल्या प्रशिक्षणाचा फायदा होऊन ३४ युवक-युवतींना थेट एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली. एअर इंडियाने विविध पदे भरण्यासाठी जाहिरात दिल्यानंतर बार्टीतर्फे मुंबई, नागपूर आणि पुणे येथील प्रशिक्षण केंद्रात युवक-युवतींना दोन महिन्यांचे मोफत आणि निवासी प्रशिक्षण दिले. हवाई उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना आणि तज्ज्ञांकडून हे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे अनुसूचित जाती, भटक्या जमाती व विमुक्त जमातीच्या युवक-युवतींना एअर इंडियामध्ये नोकरीची झेप घेता आली.
आंबेडकरांच्या घरासाठी होणार ४० कोटींची तरतूद
By admin | Published: July 12, 2015 3:07 AM