शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

राज्याच्या बजेटमध्ये कृषीक्षेत्रासाठी 25 हजार कोटींची तरतूद

By admin | Published: March 18, 2016 2:08 PM

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषीक्षेत्रासाठी 25 हजार कोटींची तरतूद केली असल्याचं सांगत राज्याचा अर्थसंकल्प मांडला.

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १८ - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषीक्षेत्रासाठी  25 हजार कोटींची तरतूद केली असल्याचं सांगत राज्याचा अर्थसंकल्प मांडला. कृषी क्षेत्राचा विकासदर 8 टक्यांपर्यंत पोहोचला आहे. शेतकरी या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. 2016 - 17 शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. 
 
जलयुक्त शिवारसाठी १ हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर शेतक-यांना सर्वात भरीव मदत यावर्षी सरकारने केली आहे. शेतक-यांसाठी राज्य आणि केंद्र सरकारची ४ हजार कोटींची तरतुद असून १८८५ कोटी राज्य सरकारने पीक विमासाठी तरतुद केली असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पारंपारिक तंटे मिटवण्यासाठी पाणंद रस्ता योजनेची घोषणा यावेळी करण्यात आली.  
 
शेततळी, विहिरी, विद्युत पंप जोडणीसाठी 2 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अल्प व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.मत्स्यसंवर्धनासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर कडधान्य आणि तेलबीयांसाठी 80 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.दोन नव्या पशू महाविद्यालयांसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली असून कृषीप्रक्रिया उद्योग उभारणा-ला 25 टक्के किंवा 50 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याचंही मुनगंटीवारांनी सांगितलं.
                    
 
अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे - 
 
- कृषी क्षेत्राचा विकासदर 8 टक्यांपर्यंत पोहोचला
- शेतकरी या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू आहे
- 2016 - 17 शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार 
- शेतक-यांच्या विविध योजनांसाठी २५ हजार कोटींची तरतुद
- स्वातंत्र्यानंतर शेतक-यांना सर्वात भरीव मदत यावर्षी सरकारने केली, शेतक-यांसाठी राज्य आणि केंद्र सरकारची ४ हजार कोटींची तरतुद, १८८५ कोटी राज्य सरकारने पीक विमासाठी तरतुद केली 
- जलयुक्त शिवारसाठी १ हजार कोटींची तरतुद
- कृषी प्रकल्प चालनेसाठी २५ टक्के किंवा ५० लाख रुपयांची मदत देणार, शेतातील पाणंद रस्त्यासाठी १०० कोटींची तरतुदी, मत्स्यसंवर्धनासाठी १५० कोटींची तरतुद
- अकोला आणि जळगाव जिल्ह्यात दोन पशूवैद्यकीय विद्यालयांचा प्रस्ताव
- शेततळी, विहिरी, विद्युत पंप जोडणीसाठी 2 हजार कोटींची तरतूद
- प्रत्येक जिल्ह्यात कुषी महोत्सव भरवणार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न करणार
- अल्प व्याजदराने शेतक-यांना कर्ज उपलब्ध करुन देणार
- कृषीप्रक्रिया उद्योग उभारणा-ला 25 टक्के किंवा 50 लाखांपर्यंत अनुदान, गोवंश रक्षा केंद्रासाठी ३४ कोटींची तरतुद, कुक्कुटपालनासारख्या कृषी संबंधीत व्यवसासायासाठी ५१ कोटींची तरतुद 
- कडधान्य आणि तेलबीयांसाठी 80 कोटींची तरतूद
- जलसिंचनासाठी ७८५० कोटींची तरतुद, प्रत्येक जिल्ह्यात सक्षम हवामान केंद्र उभारणार, राज्यातील सात प्रकल्पांचा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश, नाबार्डच्या सहाय्याने नवीन दुग्धउत्पादन केंद्र विकसित करणार
- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी ५०० कोटींची तरतुद
- ग्रामीण पेयजल योजनेसाठी 170 कोटींची तरतूद
- ऊर्जा निर्मितीसाठी ५८४ कोटींची तरतुद
- स्मार्ट गाव योजनेला चालना देणार
- वीज वितरणासाठी ३०१ कोटींची तरतूद
- उद्योग क्षेत्राला दिल्या जाणा- सवलतींसाठी २६२५ कोटींची तरतूद
- कल्याण-भिवंडी-शिळफाटा उन्नत मार्ग बांधणार
- जलसिंचनासाठी 7 हजार 850 कोटींची तरतूद
- 3 हजार 924 किमीचे नवीन राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित
- कल्याण-भिवंडी-शिळफाटा उन्नत मार्गासाठी 40 कोटींची तरतूद
- राज्य महामार्गावर दर 100 किमी अंतरावर एक असे 400 स्वच्छतागृह बांधणार
- 2022 पर्यंत सर्वांना घरे, त्यासाठी 700 कोटींची तरतूद
- अकोला, कराड, चंद्रपूर, शिर्डी विमानतळांचा विकास करणार
- वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी २६५ कोटींची तरतूद
- वीज दरातील सवलतींसाठी १ हजार कोटींची तरतूद
- २१ हजार किमीचे रस्ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधणार, रस्ते बांधणीसाठी ४ हजार ५० कोटींची तरतूद
- राज्यातील 9 रेल्वेप्रकल्पांसाठी 68 कोटी 60 लाखांची तरतूद
- चंद्रपूर शहराच्या विकासासाठी म्हाडाची स्थापना
- मेट्रो-3 साठी 90 कोटींची तरतूद
- मुंबई, नवी मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवलीतील महिलांसाठी तेजस्विनी बस, 50 कोटींची तरतूद
- पोलिसांच्या घरांसाठी 320 कोटींची तरतूद 
- ग्रामीण आरोग्यासाठी 230 कोटी रुपयांची तरतूद
- घर बांधणीसाठी स्वातंत्र्य सैनिकांना मदत देणार
- निसर्ग आणि वनपर्यटनासाठी 36 कोटींची तरतूद
- 6 व्याघ्र प्रकल्पांजवळील गावांच्या पुनर्वसनासाठी 200 कोटींची तरतूद
- चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी नमानी चंद्रभागा योजना, त्यासाठी 20 कोटींची तरतूद
- 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेसाठी 25 कोटींची तरतूद
- राज्यातील महत्त्वांच्या शहरांमध्ये CCTV प्रकल्पांसाठी 300 कोटींची तरतूद
- 10 हजार अंगणवाड्या आदर्श करणार, त्यासाठी 100 कोटींची तरतूद
- नागपूर मेट्रोसाठी 180 कोटी, तर मुंबई मेट्रो 3 साठी 90 कोटींची तरतूद
- वारली कलेच्या संवर्धनासाठी वारली हबसाठी 60 कोटींची तरतूद
- आदिवासी युवकांसाठी पालघरमधे एकलव्य क्रीडा अकादमी, त्यासाठी 25 कोटींची तरतूद
- बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीसाठी 170 कोटी
- महाराष्ट्राबाहेरील शिवाजी महाराजांच्या स्मारकांना 5 कोटींची तरतूद
- आर आर पाटील यांच्या स्मरणार्थ सांगली जिल्ह्यात भव्य सभागृहासाठी 5 कोटींची तरतूद
- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मदतीनं लोकमान्य टिळकांचं काम लोकांपर्यंत पोहचवणार
- दुष्काळामुळे 9 हजार 289 कोटी महसुली तूट
- राज्याबाहेरून येणाऱ्या मार्बल आणि ग्रेनाईटवर राज्यात प्रवेश कर लागणार
- विक्रीकर आणि इतर कर प्रणाली सोपी करण्याचा विचार
- पेट्रोल, डिझेल, हिरे, दारुवरील करवाढ आणखी एक वर्ष कायम
- लॉटरी योजनेसाठीचा कर सव्वा लाखावरुन दीड लाख करणार
- व्हॅटमध्ये 0.5 टक्के वाढ
- अर्धा लिटर खोबरेल तेलावर 12.50 टक्के कर
- चहावरील कर 5 टक्क्यांवरुन 5.5 टक्क्यांवर
- वापरलेल्या वाहनांच्या विक्रीवरील कर 12.5 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर 
- ब्रेस्ट कॅन्सरसाठी वापरण्यात येणाऱ्या मॅमोग्राफी यंत्रावरील कर माफ
- एलईडी बल्बप्रमाणेच ट्यूबवरील कर 12 टक्क्यांवरून 5.5 टक्के
- इंजेक्शनमधील निर्जंतुक पाण्यावरील कर 12 टक्क्यांवरून 5.5 टक्के
- बांबूपासून बनवलेले फर्निचर करमुक्त
- शेतीचं काटेरी कुंपण आणि जाळी यांच्यावर कराचा दर 5.5 टक्के
- नागपूर परिसरात लॉजिस्टिक हबची स्थापना करणार