शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

राज्यातील ४७७ पीएसआयची सेवाज्येष्ठता रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 6:18 AM

पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापन विभागाच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे

जमीर काझीमुंबई : पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापन विभागाच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शासनाचे निकष व नियमाचा योग्य विचार न करता, पोलीस अधिकाºयांना सेवाज्येष्ठता (सीनिअ‍ॅरिटी) देण्याचा निर्णय अंगलट आला आहे. त्याबाबत महाराष्टÑ प्रशासकीय न्यायाधीकरणाने (मॅट) दिलेल्या चपराकीनंतर, ४७७ उपनिरीक्षकांची सेवाज्येष्ठता रद्द करण्याची नामुष्की पत्करावी लागली.हे सर्व अधिकारी सध्या राज्यभरात विविध ठिकाणी सहायक निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ‘मॅट’च्या आदेशानुसार पोलीस मुख्यालयाकडून त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागाच्या गलथानपणाबाबत काही अधिकाºयांनी गेली दोन वर्षे दिलेली कायदेशीर लढाई यशस्वी ठरली आहे. त्यामुळे त्यांना आता तुलनेत लवकर पदोन्नती मिळणार आहे. २००० साली उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांतील ४७७ अधिकाºयांना, दोन टप्प्यांत म्हणजे २००१ व २००४ साली प्रशिक्षणाला पाठविण्यात आले. त्यानंतर, ते उपनिरीक्षक पदावर कार्यरत झाले. मात्र, एकाच वर्षात उत्तीर्ण झाले असताना, प्रशासनाच्या नियोजनाअभावी प्रशिक्षणाच्या कालावधीला विलंब झाल्याचे सांगत, संबंधित अधिकाºयांनी सेवाज्येष्ठता एकाच वेळी देण्याची मागणी केली. त्यानुसार, मुख्यालयातील आस्थापना विभागाने, २६ एप्रिल २००१ रोजी ट्रेनिंगला गेलेले १३१ व एक जून २००४ रोजी गेलेल्या ३४६ अधिकाºयांना त्या-त्या वर्षाऐवजी, एकाच दिवशी म्हणजे २२ मार्च २००० या तारखेपासूनची सेवाज्येष्ठता दिली. या निर्णयाला आक्षेप घेत, सुरेश शिंगटे व रमाकांत कोथळीकर आणि अन्य अधिकाºयांनी दोन स्वतंत्र याचिकेद्वारे ‘मॅट’मध्ये आव्हान दिले होते. ४७७ अधिकारी आमच्याहून कनिष्ठ असूनही, त्यांना ज्येष्ठता मिळाल्याने आमच्यावर अन्याय झाला, असा त्यांनी युक्तिवाद केला. ‘मॅट’चे सदस्य मलिक व अगरवाल यांनी तो मान्य करत, सेवाज्येष्ठता देण्याचा अधिकार महासंचालकांना नव्हे, तर शासनाला आहे, असे सांगत महासंचालकांचा निर्णय अयोग्य असल्याचा निकाल ६ जून २०१७ रोजी दिला. त्यांच्याकडून चपराक मिळाल्याने मुख्यालयाने चूक मान्य करीत, या ४७७ अधिकाºयांना पूर्वी दिलेली सेवाज्येष्ठता रद्द करण्याचे आदेश बजाविले आहेत.महासंचालकांनी ४७७ जणांची सेवाज्येष्ठता रद्द करत असल्याचे आदेश बजाविल्यानंतर, संबंधितांपैकी काहींनी त्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठामध्ये सोमवारी त्याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे.न्यायालयाने ती मान्य करीत,या निर्णयाला स्थगिती दिल्यास, येत्या आठवड्याभरात करण्यात येणारे ७०० सहायक निरीक्षकांची पदोन्नती दीर्घकाळ लांबणीवर पडू शकते. त्यामुळे दीड वर्षांपासून बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाºयांचे ‘टेन्शन’ वाढले आहे.