शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

पीएसआय पदभरतीत ‘ओबीसी’ना डावलले!

By admin | Published: February 26, 2017 12:50 AM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यातील ७५० पोलीस उपनिरीक्षकांच्या पदभरतीसाठी जारी केलेल्या जाहिरातीत इतर मागास प्रवर्गाला (ओबीसी) डावलण्यात

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यातील ७५० पोलीस उपनिरीक्षकांच्या पदभरतीसाठी जारी केलेल्या जाहिरातीत इतर मागास प्रवर्गाला (ओबीसी) डावलण्यात आले आहे. या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकही जागा राखीव ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे एमपीएससीच्या या जाहिरातीला थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्या. इंदिरा जैन यांच्यासमोर सुनावणी झाली. एमपीएससी आणि गृह विभागाच्या सचिवांना नोटीस बजावून एक आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश देतानाच न्यायालयाने, अन्यथा जाहिरातीला स्थगिती दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे. सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम हरीशचंद्र धोटे यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, एमपीएससीने या पदभरतीसाठी डिसेंबर २०१६मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र त्यात ओबीसी प्रवर्गासाठी एकही पद राखीव ठेवलेले नाही. एमपीएससीच्या २००१च्या कायद्यानुसार पदभरतीत ओबीसी प्रवर्गासाठी एकूण जागांच्या १९ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. यापूर्वी २०१० ते २०१५ दरम्यान एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या पदभरतीत ओबीसी प्रवर्गासाठी १९ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यानुसार या पदभरती प्रक्रियेतही ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी १९ टक्के म्हणजे, १४२ जागा राखीव ठेवणे अपेक्षित होते. परंतु एमपीएससीने या प्रवर्गाला जाणीवपूर्वक डावलले आहे. हा एकप्रकारे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. (प्रतिनिधी)