ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ : मुंबईच्या डबेवाल्यांनची पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचे दुत म्हणुन नियुक्ती केली आहे.याची जाणीव मुंबईच्या डबेवाल्यांनी ठेवली आहे. व वेळो वेळी स्वःता डबेवाले हातात झाडू घेउन स्वच्छता मोहीम राबवत आहेत.पण या वेळी अस्वच्छते मुळे होणार्या "हेपिटायटिस"या आजारा पासुन कसे दुर रहाणार याचा संदेश मुंबईकरांना मुंबईचे डबेवाले देणार आहेत.हेपिटायटिस चा संसर्ग कसा होतो ?हेपिटायटिस विषाणूमुळे होतो. पण, त्यांच बरोबर संसर्ग आणी टॉक्सीकमुळेही हेपिटायटिस होऊ शकतो. हेपिटायटिस 'ए' आणी 'बी' 'सी' 'डी' आणी 'ई' हे प्रमुख पाच विषाणू आहेत.'ए' आणी 'ई' विषाणूचा संसर्ग हा दूषित पाणी आणी अन्नामुळे होतो.अस्वच्छतेमुळे या विषाणूंचा संसर्ग होतो.हेपिटायटिस 'बी','सी' आणी 'डी' या विषाणूचा संसर्ग रक्त आणी रक्तातील घटकामघुन संक्रमित होतो.वापरलेल्या सुईचा पुन्हा वापर करणे.शरीरसंबधातून हे विषाणू संक्रमित होतात.---------------------------- हेपिटायटिस पासून बचाव कसा कराल ? शारीरिक स्वच्छता राखा.शौचालयालत जावून आल्यावर हात स्वच्छ धुवा.जेवण तयार करण्याआधी हात स्वच्छ धुवा.स्वच्छ पाणी प्या. उघड्यावरील अथवा साठवून ठेवलेले पाणी पिणे टाळा. अन्न शिजवल्यावर झाकून, स्वच्छ जागी ठेवा.पालेभाज्या, सलाड स्वच्छ धुवून ध्या.घरी शिजवलेले अन्न खा.रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाणे टाळा.आणीक खबरदारीचा उपाय म्हणून डबेवाल्यांनी आपली हेपिटायटिस ची चाचणी करून घ्यावी डबेवाल्यांन साठी मुंबई जेवण डबे वहातुक मंडळा ने फुड अॅन्ड ड्रग्स कन्झुमर्स वेल्फेअर केमेटी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १०/७/२००१६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे पर्यंत दलजित जिमको, सातबंगला अंधेरी मुंबई येथे मोफत चाचणी उपल्ब्द करून दिली आहे.तरी जास्तित जास्त डबेवाल्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई जेवण डबे वहातुक मंडळाच्या वतिने करण्यात आले आहे.