शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

इंडो एनर्जी जेटीबाबत जनसुनावणी

By admin | Published: November 19, 2016 3:11 AM

नवीन जेटीच्या बांधकामासंदर्भात जनसुनावणीचे आयोजन १९ नोव्हेंबर रोजी कोर्लई व २१ नोव्हेंबर रोजी सानेगाव जेटी येथे करण्यात आले आहे.

मिलिंद अष्टिवकर,

रोहा- सानेगाव येथे सुरू असलेल्या जेटीचे विस्तारीकरण तसेच कोर्लई (ता. मुरुड-जंजिरा) येथील प्रस्तावित नवीन जेटीच्या बांधकामासंदर्भात जनसुनावणीचे आयोजन १९ नोव्हेंबर रोजी कोर्लई व २१ नोव्हेंबर रोजी सानेगाव जेटी येथे करण्यात आले आहे. नवीन प्रस्तावाबाबत फाईन इनवायरो टेक इंजिनीअर्स या पर्यावरणविषयक सल्लागार कंपनीने प्रकल्पाचा संक्षिप्त अहवाल सादर केला आहे. या संक्षिप्त अहवालातील विविध मुद्द्यांचा अभ्यास केला असता इंडो एनर्जी जेटीचा हा भस्मासुर सानेगाव, वावेपोटगे, डोंगरी, शेणवई, झोळांबे, गोफण, भागीरथीखार, कुंभोशी या रोहा तालुक्यातील गावांसह मुरुड तालुक्यातील कोर्लई, रेवदंडा, साळाव, निडी, चेहेर, मिठेखार या गावातील ग्रामस्थांना गावातून हद्दपार करणारा ठरेल, अशी भीती शेतकरी कामगार पक्षाचे सानेगाव विभागातील तालुक्यातील ज्येष्ठ नेते तसेच जिल्हा बँकेचे संचालक गणेश मढवी यांनी व्यक्त केली आहे.इंडो एनर्जी इंटरनॅशनल लि. या कंपनीने २००५ पासून सानेगाव येथील जेटीवरून कोळसा, गंधक या मालाच्या हाताळणीस सुरुवात केली. स्थानिकांना रोजगार, परिसराचा विकास अशी स्वप्ने दाखविण्यात आल्याने कोणताही विरोध झाला नाही. प्रदूषण होऊ नये यासाठी सर्वतोपरी उपाय करण्यात येतील असे आश्वासन यावेळी देण्यात आले होते. परंतु मागील सात-आठ वर्षांपासून या जेटी व्यवस्थापनाचे काळे कारनामे स्थानिकांच्या निदर्शनास आले आहेत. स्थानिक जनतेमध्ये फूट पाडत आपला व्यवसाय करण्याचे धोरण जेटीमार्फत अवलंबिण्यात येत आहे. वायू प्रदूषण,ओव्हरलोड माल वाहतूक, रस्त्याची झालेली दुरवस्था, सतत उडणाऱ्या कोळशाच्या भुकटीमुळे भातशेती तसेच फळबागांच्या उत्पन्नात झालेली घट, कोळशावर फवारणी करण्यात येणारे पाणी थेट कुंडलिका पात्रात जात असल्याने आलेला मत्स्य दुष्काळ यामुळे सानेगाव, यशवंतखार, करंजवीरा, दापोली, कुंभोशी, गोफण, महादेवखार या गावातील शेतकरी व मासेमार यांच्यावर विद्यमान प्रकल्पामुळे उपासमारीची वेळ आल्याचे दिसून येत आहे. वावेपोटगे,डोंगरी या गावातील घरांमध्ये पावसाळी दिवस वगळता घरातील प्रत्येक वस्तूवर कोळशाच्या भुकटीचे थर दिसून येतात. सध्या असलेल्या सानेगाव येथील इंडो एनर्जी जेटी व्यवस्थापनाकडून स्थानिकांच्या मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे.मुरुड तालुक्यातील कोर्लई गावानजीकच्या रॅटबेटाजवळ ५२५ मीटर म्हणजे सुमारे अर्धा किलोमीटरहून अधिक लांबीचा धक्का जेटी उभारण्यात येणार आहे. या जेटीसाठी ५० हेक्टर १२५ एकर क्षेत्रात भराव करून बंदराची निर्मिती करण्यात येणार आहे. या भरावासाठी लागणारे दगड, माती वगैरे साधनसामग्री परिसरातूनच उपलब्ध करण्यात येणार आहे. रोहा तालुक्यातील सानेगाव येथे उभारण्यात आलेला धक्का केवळ २०० मीटर लांबीचा असून १२.५ एकर जागेत आहे. इतक्या लहान प्रमाणात असणाऱ्या जेटीवरून मालाच्या हाताळणीमुळे विभागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. हे पाहता कोर्लई जेटीमुळे स्थानिक पर्यटन, पर्यावरण, मासेमारी उद्योग तसेच नारळ व सुपारीच्या बागा यासह रेवदंडा येथील खाडीवरील पुलाला मोठा धोका उत्पन्न होणार आहे.>भविष्यात अनेक समस्या : प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात लहान जहाजे या धक्क्यावर मालवाहतुकीसाठी येणार असली तरी भविष्यात केप आकाराची मोठी मालवाहू जहाजे या धक्क्यावर माल आणणार आहेत. मोठी जहाजे या धक्क्यापर्यंत पोहचण्यासाठी २३ दशलक्ष क्युबिक मीटर उत्खनन करून १७७५ किमी लांबीचे चॅनेल खोल समुद्रातून प्रस्तावित बंदरापर्यंत करण्यात येणार आहे. याचा स्थानिक मासेमारांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. तसेच कोर्लई येथील प्रस्तावित धक्क्यापासून सानेगावपर्यंतच्या जेटीवर ४५०० डीडब्ल्यूटी क्षमतेच्या बार्जेस जाण्यासाठी १७५ दशलक्ष घनमीटर इतके उत्खनन कुंडलिकेच्या मुखापासून सानेगावपर्यंत करण्यात येणार आहे. यामुळे कुंडलिका खाडी किनारी असणाऱ्या भात शेतीची धूप होणार आहे. स्थानिकांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असला तरी तो बहुतांशी अकुशल स्वरूपाचा असेल. स्थानिक पर्यावरण, पर्यटन, शेती, मासेमारी यांचा ऱ्हास करणारा हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास स्थानिकांना घरेदारे विकून हद्दपार व्हावे लागेल, अशी प्रतिक्रि या शेकापचे ज्येष्ठ नेते गणेश मढवी यांनी दिली आहे. या प्रकल्पाविरोधात सर्वांनी एकजूट दाखवावी असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. पायाभूत सुविधांचा विकास झाल्याशिवाय या जेटीला परवानगी देण्यात येऊ नये, असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.>जनसुनावणीत निर्भीडपणे प्रश्न मांडासानेगाव (ता. रोहा) येथे इंडो एनर्जी जेटी प्रकल्पाचे विस्तारीकरण होणार आहे. तर मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे नवीन जेटी उभारण्यात येणार आहे. यासाठी पर्यावरण विभागातर्फे १९ नोव्हेंबर रोजी कोर्लई येथे तर २१ नोव्हेंबर रोजी सानेगाव येथे जनसुनावणीचे आयोजन केले आहे. या जनसुनावणीदरम्यान स्थानिक जनतेने आपले प्रश्न व समस्या निर्भीडपणे मांडाव्यात. स्थानिक आमदार म्हणून मी नेहमीच जनतेच्या पाठीशी आहे असे अभिवचन आ. पंडित पाटील यांनी लक्ष्मीनगर रोहा येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थितांना दिले. या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक धामणे, हेमंत ठाकूर आदी उपस्थित होते.