मुंबई : मेट्रोच्या दरासंदर्भातील ठोस निर्णय घेण्यासाठी भाडे निश्चिती समितीच्या वतीने ११ जून रोजी सकाळी १० वाजता डी. एन. नगरमधील मेट्रो यार्डात जनसुनावणी घेण्यात येणार असून, याबाबत आतापर्यंत १८१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुंबईकरांच्या हितासाठी राज्य सरकारने मुंबई मेट्रो सुरू केली असून, आजही ही सेवा सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थापन झालेल्या भाडे निश्चिती समितीकडे १८१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, या जनसुनावणीसाठी सरकारने नोडल आॅफिसर द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.
मेट्रो दरासाठी जनसुनावणी
By admin | Published: June 11, 2015 1:44 AM