नागपूर : महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ४८ तासांपूर्वी निवडणूक विभाग व पोलीस विभागाकडून अनुमती घ्यावी लागणार आहे. जाहीर प्रचारसभेसाठी वेळेवर अनुमती मिळणार नाही. प्रचारासाठी आलेल्या प्रचारकांना प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर किंवा त्यांच्याविषयी पोलिसांना संशय असल्यास, अशा व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत वास्तव्य न करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक उमेदवाराला आॅनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याला प्रशिक्षित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)शौचालयाचा वापर आवश्यक स्थानिक स्वराज्य संस्थेचा उमेदवार होण्यासाठी उमेदवाराकडे शौचालय असणे आवश्यक असून, त्याचा वापर करीत असायला हवा. अन्यथा उमेदवारांना निवडणूक लढता येणार नाही. याबाबत हमीपत्र द्यावे लागणार आहे.एका प्रभागात एका जागेवरच लढता येईलच्एका उमेदवाराने एका प्रभागातील एकापेक्षा जास्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्यास, छाननीच्या वेळी कोणत्या जागेची निवडणूक लढवायची आहे, या विषयी उमेदवाराची लेखी इच्छा विचारात घेण्यात येईल. लेखी हमी न दिल्यास, प्रथम दाखल केलेला उमेदवारी अर्ज विचारात घेतला जाणार आहे.
प्रचारसभेसाठी वेळेवर अनुमती मिळणार नाही
By admin | Published: January 26, 2017 2:27 AM