शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
2
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
4
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
5
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
6
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
7
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
8
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
9
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
10
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
11
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
12
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
13
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
14
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
15
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
17
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
18
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
19
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
20
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?

नियोजित महापालिकेची जनसुनावणी

By admin | Published: July 18, 2016 2:36 AM

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली नियोजित पनवेल महानगरपालिकेची जनसुनावणी शनिवारी कोकण भवन येथे पार पडली.

पनवेल : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली नियोजित पनवेल महानगरपालिकेची जनसुनावणी शनिवारी कोकण भवन येथे पार पडली. जनसुनावणीवेळी आपल्या हरकती व तक्रारी नोंदविलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली ही जनसुनावणी पार पडली. महानगरपालिकेत समाविष्ट भागाचा वेध घेतल्यास अनेकांनी पनवेल महानगरपालिकेला हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र खारघर शहरातून पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट होण्यास तीव्र विरोध दर्शविण्यास येत असल्याचे याठिकाणी स्पष्ट झाले आहे. पनवेल नगरपरिषद हद्दीसह शहर आणि वसाहती, सिडको क्षेत्रातील २१ गावे, नवी मुंबई विमानतळ अधिसूचित (नैना) क्षेत्रातील ३६ गावे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील ११ गावांचा यामध्ये समावेश केला जाईल. शहर आणि ६८ गावे एकत्रित करून त्यात ५ लाख ९५ हजार लोकसंख्या गृहीत धरलेली आहे. जनसुनावणी वेळी ६८ गावांपैकी बहुतांशी गावांनी महानगरपालिकेत समाविष्ट होण्यास तयारी दर्शविली. खारघर, तळोजामधील शेकडो रहिवासी, लोकप्रतिनिधी याठिकाणी उपस्थित होते. खारघरसाठी स्वतंत्र महानगरपालिका असावी असा सूर या जनसुनावणीच्या वेळी उमटताना दिसला. भाजपा, सेना महानगरपालिकेच्या बाजूने असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. नागरिकांच्या हरकती व सूचनांचा अभ्यास करून अहवाल तयार केला जाईल, त्यानंतर तो अहवाल पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच महानगरपालिकेचे चित्र स्पष्ट होणार आहे. खारघरमधील नागरिकांनी याठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांचा हवाला देत सद्य:स्थितीत खारघरचा महानगरपालिकेत समावेश करू नये, अशी विनंती केली. नियोजित पनवेल महानगरपालिकेच्या अनुषंगाने चार हजारांच्या आसपास सूचना व हरकती जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या आहेत. नियोजित महानगरपालिका परिसर व शहरामधून सर्वात जास्त सूचना व हरकती खारघर शहर व परिसरातून आलेल्या आहेत त्याची प्रचिती जमलेले विविध पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक यांच्या उपस्थितीवरून दिसून आली. पनवेल नगरपरिषदेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार नव्याने प्रभाग रचना देखील करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवस नागरिकांमध्ये संभ्रम होता. हरकतींवर व सूचनांवरील सुनावणी आता देखील पार पडली असून लवकरच महानगरपालिकेचे चित्र स्पष्ट होणार आहे हे मात्र निश्चित आहे. (प्रतिनिधी)