शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

सार्वजनिक भूखंड धार्मिक स्थळांना ‘दान’ करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2016 2:51 AM

धार्मिक स्थळांच्या नावाखाली सार्वजनिक भूखंड कवडीमोल दराने किंवा फुकटात लाटण्याच्या वृत्तीला चाप बसवण्यासाठी यापुढे धार्मिक स्थळांसाठी भूखंड ‘दान’ न करता

मुंबई : धार्मिक स्थळांच्या नावाखाली सार्वजनिक भूखंड कवडीमोल दराने किंवा फुकटात लाटण्याच्या वृत्तीला चाप बसवण्यासाठी यापुढे धार्मिक स्थळांसाठी भूखंड ‘दान’ न करता पारदर्शक पद्धतीने म्हणजेच निविदा प्रक्रियेने देण्याची सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. सार्वजनिक जागा जनहितासाठी असून, त्यावर अतिक्रमण करून राज्यघटनेच्या अनुच्छेद १४चे उल्लंघन होत असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. महापालिका, एमएमआरडीए, एमआयडीसी, म्हाडा, नगरविकास विभागांच्या ताब्यातील भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने सांगितले. यापुढे सार्वजनिक भूखंड धार्मिक स्थळांना ‘दान’ करण्याऐवजी ‘एमआरटीपी’ कायद्यानुसार निविदा प्रक्रिया पार पाडूनच देण्यात यावे, अशी सूचना न्यायालायने सरकारला केली. सरकारच्या दानशूरपणामुळे नागरिक त्यांच्या समान संधीच्या अधिकारापासून वंचित राहत असल्याचे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले. (प्रतिनिधी) त्यांच्यावरही कारवाई करा...रस्ते चालण्यास किंवा वाहने चालवण्यास योग्य असणे हा नागरिकांचा अधिकार आहे; आणि त्यापासून वंचित ठेवण्याचा अधिकार कोणताच धर्म देत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने बेकायदा धार्मिक स्थळे बांधणाऱ्यांवरही फौजदारी कारवाई करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. काय म्हणाले उच्च न्यायालय?५ मे २०११ रोजी काढलेल्या अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी न करून राज्य सरकारने गेले साडेपाच वर्षे बेकायदा धार्मिक स्थळे बांधण्यासाठी लोकांना एक प्र्रकारे प्रोत्साहनच दिल्याचे दिसते. या अधिसूचनेनुसार, केवळ रस्ते किंवा फुटपाथवरील धार्मिक स्थळांवरच कारवाई न करता अन्य सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या धार्मिक स्थळांवरही कारवाई करणे बंधनकारक आहे. सरकारने केवळ रस्ते व फुटपाथवरीलच धार्मिक स्थळांवर कारवाई केली असून, ती पुरेशी नसल्याचे न्यायालयाने म्हटले. राज्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणांवरील धार्मिक स्थळांची मोजणी ३१ मार्च २०१७पर्यंत करून आकडेवारी राज्य सरकारने सादर करावी. आतापर्यंत सरकार व महापालिकांनी बेकायदा धार्मिक स्थळांची जी आकडेवारी दिली आहे, त्या सर्व धार्मिक स्थळांवर ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचा आदेशही दिला. बेकायदा धार्मिक स्थळांवरील कारवाईच्या आड येणाऱ्या राजकीय नेते किंवा संघटनांवर गुन्हा नोंदवण्यात यावा.