पिंपरी : विरोधक व आघाडीतील पक्ष नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर केले जाणारे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यामुळे त्याची पर्वा आम्ही करीत नाही. मुख्यमंत्र्यांच्या प्रामाणिक कारभारावर जनतेचा पूर्ण विश्वास आहे, असे प्रतिपादन त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले.
पिंपरी-चिंचवडमध्ये शहर महिला काँग्रेसतर्फे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. अत्रे सभागृहात दिवसभर झालेल्या या शिबिरात पक्ष संघटना मजबूत व कार्यकत्र्याचे मनोबल वाढावे, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिर हे पक्षातंर्गत काम असल्याने माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नव्हता. शिबिरानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
चव्हाण म्हणाल्या, निवडणूक काळात मुख्यमंत्री राज्यात सर्वत्र प्रचारासाठी फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात प्रचार करण्याची जबाबदारी आम्ही कुटुंबीय पेलत असतो. संपूर्ण कूटुंब त्यामध्ये उरतले. राजकारण हा माझा प्रांत नाही. गेल्या अनेक वर्षापसून शिक्षणक्षेत्रत कार्यरत आहे.
शिबिरास राष्ट्रीय महिला काँग्रेस समितीच्या माजी सचिव शामला सोनवणो, प्रदेश महिला काँग्रेस समितीच्या माजी सरचिटणीस निगार बारस्कर, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष ज्योती भारती, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनोज कांबळे, माजी नगरसेविका निर्मला कदम, गोपाळ मोरे आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
4नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला. पक्षाने केलेले काम जनतेर्पयत पोहोचवण्यात काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी कमी पडले. त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन निदान महिलांना तरी प्रशिक्षण देता येईल. या उद्देशाने शिबिराचा उपक्रम हाती घेतला आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि कार्यकत्र्यांचे मनोबल वाढविण्यासाठी अशा शिबिरांची गरज आहे. आतापयर्ंत राज्यातील 3क् जिल्ह्यात प्रशिक्षण कार्यशाळा घेतली आहे.