कोणत्याही राजकीय नेतृत्वाकडे पाहण्याचा लोकांचा एक दृष्टिकोन डोळ्यांनी पाहिलेल्या घटनांवरून आणि कानांवर पडलेल्या किश्शांवरून बनत असतो. सामान्य लोकांनीच निवडून दिलेले नेते कसे वागतात, कसे बोलतात, कसे राहतात, अशा अनेक गोष्टींवरून त्यांच्याविषयीची मतमतांतरे बनविली जातात. प्रत्यक्षात नेतृत्व करणे हे काही सोपे काम नाही. आमच्या वेळी राजकारण असे नव्हते, असे उसासे टाकत सांगणारे आधीच्या पिढीतील लोक नव्या पिढीच्या नेतृत्वाला पुरते बाद ठरवून मोकळे होतात. पण नव्याने उदयाला आलेले आणि स्थिरस्थावर झालेले, होऊ पाहणारे अनेक नेते राजकारण आणि समाजकारणाचा विचार वेगळ्या पद्धतीने राजकारणाची प्रस्थापित चौकट मोडून करताना दिसतात. म्हणूनच तर त्यांच्याकडून आजही अनेकांना खूप अपेक्षा आहेत. अशा अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला सर्वांत जास्त कोणाकडून आहेत याचा कौल तुमच्या मतांमधून आणि ज्यूरींच्या निवडीतून मिळणार आहे. कोणाकडून आहेत अपेक्षा? (नामांकने)१) आदित्य ठाकरे - शिवसेना - मुंबई२) अमित देशमुख - काँग्रेस - मराठवाडा३) धनंजय मुंडे - राष्ट्रवादी - मराठवाडा४) मिलिंद देवरा - काँग्रेस - मुंबई५) पंकजा मुंडे - भाजपा - मराठवाडा६) राजीव सातव - काँग्रेस - मराठवाडा७) संजीव नाईक - राष्ट्रवादी - नवी मुंबई८) सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी - प. महाराष्ट्र९) विनोद तावडे - भाजपा - मुंबई१०) विश्वजीत कदम - काँग्रेस - प. महाराष्ट्र> आॅनलाइन मतदान असे करता येईल!नामांकने www.lokmat.com येथे जाहीर करण्यात आली आहेत. आपण या साईटवर जा. तेथे ‘व्होट नाऊ’ असे लिहिलेले असेल. त्यावर क्लिक केले की आपल्यासमोर मतदानासाठी सगळी नामांकने येतील. विविध विभागासाठीच्या नामांकनांची यादी आपल्याला तेथे दिसेल. फोटोंवर क्लिक केल्यास त्या व्यक्तीविषयीची माहिती येईल आणि आपल्याला ज्या व्यक्तीला मतदान करायचे आहे त्यांच्या नावावर क्लिक केल्यास आपले मत त्या व्यक्तीस मिळेल. एका विभागात एकाच व्यक्तीला मतदान करता येईल. सगळ्यात शेवटी ‘कन्फर्म व्होट’ असे लिहिलेले आहे. त्यावर क्लिक केल्यास आपली मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. आपण कोणत्या विभागासाठी कोणाला मतदान केले आहे त्याची यादी त्यानंतर लगेच आपल्याला दिसेल. तर चला, आॅनलाइनला भेट द्या आणि निवडा आपले विजेते..!(सर्व नामांकनांचा क्रम इंग्रजी आद्याक्षरानुसार)
जनता सांगेल... ‘कोणाकडून आहेत अपेक्षा?’
By admin | Published: March 21, 2016 3:50 AM