बडोदा- महाराष्ट्र शासनातर्फे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्रग्रंथाच्या बारा खंडांचे प्रकाशन चं. चि. मेहता सभागृहात करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, महाराजा समरजितसिंह गायकवाड, महापौर भारत डांगर, रवींद्र वायकर, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. अक्षयकुमार काळे, नियोजित संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मराठी वाड्मय परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर, सिद्धार्थ खरात, धनराज माने आदी उपस्थित होते.महाराज सयाजीराव गायकवाडांचे काम इतके वर्षे दुर्लक्षित राहिले. या चांगल्या कामाची संधी मिळावी, अशी मागील राज्यकर्त्यांची इच्छा असावी, अशी मिश्किल टिपण्णी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी बडोदा येथील साहित्य संमेलनात प्रकाशन समारंभाप्रसंगी केली.सांस्कृतिक मंत्री गमतीत काही बोलले तरी त्याची बातमी होते. कारण, माझ्याकडे असलेली खाती अत्यन्त जवलनशील आहेत. त्यामुळे चटके सहन करावेच लागतात, असेही त्यांनी नमूद केले
महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्रग्रंथाच्या बारा खंडांचं झालं प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 1:14 PM