शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
3
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
4
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
5
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
6
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
7
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
8
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
9
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
10
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
11
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
12
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

पक्ष्यांच्या प्रमाण मराठी नावांची सुधारित यादी प्रकाशित

By admin | Published: January 24, 2016 12:10 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये शनिवारी सुरु झालेल्या २९ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात पक्ष्यांच्या प्रमाण मराठी नावांची सुधारित यादी प्रकाशित करण्यात आली.

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये शनिवारी सुरु झालेल्या २९ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात पक्ष्यांच्या प्रमाण मराठी नावांची सुधारित यादी प्रकाशित करण्यात आली. या यादीत ११ नवीन नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. बीएनएचएसच्या पक्षी व जैवविविधता क्षेत्र उपक्रमांतर्गत प्रकल्प अधिकारी डॉ. राजू कसंबे यांनी ही यादी संकलित केली आहे.वाईल्ड कोकण व निसर्गप्रेमी मंडळ-सावंतवाडी यांनी २९ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र-चिपळूण हे संमेलनाचे समन्वयक आहेत. संमेलनाचे यजमानपद सावंतवाडी नगरपरिषदेकडे आहे. २४ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या संमेलनाची संकल्पना ‘पक्षी आणि पर्यटन’ आहे. महाराष्ट्रात व संपूर्ण भारतात पक्षी तसेच अन्य वन्यजीवांची विविधता आढळते. नैसर्गिक विविधतेतून निर्माण झालेल्या सांस्कृतिक विविधतेमुळे प्रत्येक भाषेत पशु-पक्ष्यांची निरनिराळी सुंदर नावे रूढ झाली आहेत. कोकणापासून विदर्भापर्यंत संपूर्ण राज्यातील अभ्यासक, निरीक्षक व निसर्गप्रेमींचा गोंधळ होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे सर्व प्रजातींची शास्त्रीय नावे जगभरात एकच ठरवलेली आहेत, त्याप्रमाणे मराठीत सर्व पक्ष्यांना एक प्रमाण नाव असावे या उद्देशाने ही यादी प्रकाशित करण्यात आली आहे. यापूर्वी संकलित केलेल्या यादीत महाराष्ट्रात अलीकडे झालेल्या पक्ष्यांच्या नोंदींची भर पडल्याने आता सुधारित यादीत एकूण ५७७ प्रजातींच्या नावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)सुधारित यादीत नव्याने समाविष्ट झालेले पक्षीसमुद्री पाणडुबी, मोठा तापस, पांढऱ्या माथ्याचा कलहंस, लाल मानेचा फलारोप, लाल फलारोप, प्राच्य शिंगळा घुबड, नारिंगी छातीची हारोळी, लाल छातीचा पोपट, लाल पंखांचा चातक, वाळवंटी वटवटवट्या व पांढरी-निळी माशीमार