शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
5
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
6
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
7
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
8
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
9
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
10
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
11
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
12
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
13
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
14
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
15
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
16
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
17
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
18
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
19
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
20
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?

Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 6:01 PM

Puja Khedkar latest Update : केंद्रीय लोक सेवा आयोगाने प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी उमेदवारी रद्द केली असून, आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Puja Khedkar Latest News : केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या कारवाईनंतर IAS पद गमावलेल्या पूजा खेडकरला आता केंद्र सरकारनेही दणका दिला आहे. केंद्र सरकारनेपूजा खेडकरला भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. (Puja Khedkar discharges from Indian Administrative Service with immediate effect by Central government)

बनावट प्रमाणपत्र आणि नाव बदलून नियमांचे उल्लंघन करत अनेक वेळा युपीएससी परीक्षा दिल्याच्या आरोपामुळे पूजा खेडकर वादात सापडली. पुण्यातील प्रशिक्षणार्थी काळातच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक आणि वडिलांकडून अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा केल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले होते.  यूपीएससी पाठोपाठ केंद्र सरकारची पूजा खेडकरवर कारवाई

केंद्रीय लोक सेवा आयोगाने चौकशी करून पूजा खेडकरवर कारवाई केली. त्यानंतर केंद्रानेही मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने प्रशासकीय सेवा प्रोबेशन नियम,१९५४ च्या १२ व्या नियमानुसार पूजा खेडकरवर ही कारवाई केली आहे. तिला भारतीय प्रशासकीय सेवेतून तात्काळ मुक्त केले आहे. 

गाडी, ऑफिसची मागणी अन् IAS ची नोकरीच गेली

३४ वर्षीय पूजा खेडकरचे प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून महाराष्ट्रात प्रशिक्षण सुरू होते. पुणे जिल्हा कार्यालयात प्रशिक्षण सुरू असतानाच पूजा खेडकरने कार, स्वतंत्र कार्यालयाची मागणी केली. खासगी ऑडी ती वापरात होती. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे चेंबरही तिने बळकावले. तिच्या वडिलांनी तहसीलदाराला धमकीच्या भाषेत सुनावले. त्यानंतर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सचिवांकडे तक्रार केली होती. 

पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र जोडून नोकरी मिळवल्याचे आरोप झाले. त्याचबरोबर नाव बदलून अनेक वेळा यूपीएससीची परीक्षा दिल्याचाही प्रकार समोर आला. यानंतर मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकादम प्रशासनाने त्यांचे प्रशिक्षण थांबवत हजर होण्याचे आदेश दिले. पण, पूजा खेडकर हजर झालीच नाही. 

यूपीएससीने उमेदवारी केली रद्द

दरम्यान, पूजा खेडकरने नियम डावलून, नाव बदलून अनेक वेळा परीक्षा दिल्याची यूपीएससीने चौकशी केली. यात ती दोषी ठरली. नियमांची पायमल्ली केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवत यूपीएससीने तिची प्रशिक्षणार्थी IAS नियुक्ती रद्द केली. आणि कायम स्वरुपी यूपीएससी परीक्षा देण्यावर बंदी घातली. 

टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरCentral Governmentकेंद्र सरकारupscकेंद्रीय लोकसेवा आयोगPuneपुणे