- प्राची सोनवणे, नवी मुंबईअत्यल्प पावसामुळे राज्यभरात दुष्काळाचे सावट पसरले असून, उत्पादन घटल्याने एपीएमसीच्या धान्य मार्केटमध्ये डाळींची आवक कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे डाळींचे घाऊक दरही कडाडल्याने त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. गेल्या आठवड्यात धान्य मार्केटमध्ये दिवसाला डाळींचे सरासरी १०९ ट्रक व २७६ टेम्पोंची आवक झाली होती. परंतु डाळींचे उत्पन्न घटल्याने या आठवड्यात दिवसाला डाळींचे सरासरी १०३ ट्रक २७० टेम्पोची आवक झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून किरकोळ बाजारातील डाळींचे दर प्रतिकिलो दीडशे ते दोनशे रुपयांच्या घरात गेले आहेत. मागणी-पुरवठ्याचे गणित जुळेनागेल्यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने बळीराजावर मोठ्या प्रमाणात संकट ओढवले आहे. पाण्याअभावी उत्पादन घटल्याने मागणी तसा पुरवठा केला जात नाही. डिझेलचे वाढते दर, ट्रान्सपोर्टच्या वाढत्या खर्चामुळेही किमतींमध्ये वाढ झाली आहे. साठेबाजांवर कठोर कारवाई केली तर नक्कीच मागणी तसा पुरवठा करता येणे शक्य आहे. तूरडाळीची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र त्यादृष्टीने उत्पादन न झाल्याने मागणीनुसार पुरवठा होत नसून किमती वाढल्या आहेत., असे ग्रेन राईस अॅण्ड आॅईल सिडस् मर्चंट असोसिएशन (ग्रोमा)चे सचिव पोपटलाल भंडारी यांनी सांगितले.सर्वच डाळींच्या किमतीत वाढ झाली असून, चणाडाळ १०० ते १३० रुपये किलो, मसूर डाळ ८० ते १०० रुपये, मूगडाळ ९० ते १२० रुपये, उडीद डाळ १५५ ते १८० रुपये किलो, वाल ८० ते ११० रुपये किलो, वाटाणे ६० ते ८० रुपये किलो आणि शेंगदाणे ९० ते १४० रुपये किलो दराने मिळत आहेत. घाऊक बाजारपेठेतील दरडाळप्रतिक्विंटल (कमीत कमी -जास्तीत जास्त)हरभरा ७,७०० - १०,६००मसूर डाळ६,२०० - ७,३००माठ ६,५०० - ७,३००मुग डाळ७,६०० - ८,१००उडीद डाळ१४,८०० - १६,०००वाल ७,१०० - ७,८००पांढरा वाटाणा३,६०० - ४,०००शेंगदाणे६,००० - ९,०००
डाळींनी गाठली शंभरी
By admin | Published: June 19, 2016 2:18 AM