लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : सध्याच्या पिढीची फास्ट फूडला अधिक पसंती आहे. पण, चवीला व आरोग्यासाठी उत्तम असणाऱ्या रानभाज्या विस्मृतीत गेल्या आहेत. या भाज्यांची माहिती असली, तरी त्यांची पाककृती अनेक महिलांना माहीत नाही. ती करून देण्यासाठी सुभेदारवाडा कट्ट्यातर्फे ‘रानभाज्या पाककृती आणि प्रदर्शन’ हा कार्यक्रम शनिवारी सुभेदारवाडा शाळेत झाला. या वेळी रानभाज्यांच्या खरेदीसाठी शहरी महिलांची झुंबड उडाली होती.भामरी, रानकारवा, भोपा, केना, बडदा, गोमेटी, तेरा, तांदळा, कुड्याची फु ले, कडुकांद, कंटोली, तेरा, आळीव, भारंगी, नारळी, वेल, कोळा, कोरडू, खरशिंग शेंग, माठ, लोत अशा विविध भाज्यांची ओळख मुरबाड येथील सहा आदिवासी महिलांनी या वेळी शहरी महिलांना करून दिली. रानभाज्यांची पाककृती कशी करावी, त्यांचे गुणधर्म, त्यांची गावाकडील नावे अशी माहिती सांगण्यात आली. आदिवासी महिलांनी आणलेल्या ५० प्रकारच्या रानभाज्या खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली. त्यामुळे हातोहात या भाज्यांची विक्री झाली. शहरी महिलांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे ही आदिवासी महिलांनी दिली. त्यांनी आणलेल्या शुद्ध मधालाही उत्तम मागणी होती.या वेळी श्रमिक मुक्ती संघटनेच्या अॅड. इंदवी तळपुळे, आमदार नरेंद्र पवार, केडीएमसीच्या शिक्षण समिती सभापती वैजयंती घोलप, कट्ट्याचे दीपक जोशी आदी उपस्थित होते.रासायनिक खतांचा वापर नाहीरानभाज्या खाल्ल्याने पोटदुखी, अंगदुखी आणि त्वचारोग होत नाहीत, हे या रानभाज्यांचे प्रमुख फायदे आहेत. याशिवाय, ओसाड माळरानात पावसाळ्यात या रानभाज्या उगवतात. या भाज्यांसाठी कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरले जात नाही. त्यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारचे विषारी घटक जात नाहीत.
रानभाज्यांच्या खरेदीसाठी उडाली झुंबड
By admin | Published: July 11, 2017 4:19 AM