राहुल कलाल - पुणो
ढगाळ हवामान, तापमानातील चढ-उतार आणि पडू लागलेल्या पावसामुळे पुणोकरांचा घसा ‘जाम’ झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पुण्यात सर्दी-खोकला, साधा आणि डेंगी-मलेरियासदृश ताप, घसादुखीने पुणोकरांना घेरले आहे, यामुळे दवाखान्यांमध्ये रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे.
4जून महिन्यात येणारा पाऊस जुलै महिन्यात आल्याने हवामानात मोठे बदल होत आहेत. कधी ऊन, कधी ढगाळ हवामान तर कधी पाऊस अशा वातावरणामुळे हवेतील विषाणूंच्या वाढीसाठी पोषण वातावरण निर्माण झाले आहे आणि या विषाणूंनी पुणोकरांवर हल्लाबोल केला आहे.
4प्रामुख्याने हवेतून आणि अन्नातूून शरीरात प्रवेश करणा:या या विषाणूंमुळे सर्दी-खोकला, ताप येणो, घसादुखी, उलटी, जुलाब या आजारांचे प्रमाण वाढले आहे. पालिकेच्या दवाखान्यांसह खासगी दवाखान्यांमध्येही या रुग्णांचे उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढले आहे.
4पुणो महापालिकेच्या लेले दवाखान्यातील डॉक्टर नीला लिमये म्हणाल्या, ‘गेल्या आवठडय़ापासून हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत.’
4त्यातच दोन-तीन दिवसांपासून पाऊसही सुरू झाल्याने सर्दी-खोकला, घसादुखी आणि ताप या रुग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. याचबरोबर डेंगी आणि मलेरियासदृश रुग्णांची संख्याही झपाटय़ाने वाढू लागली आहे.
4उलटी, जुलाब या रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब हे आजार होत असल्याने पाणी गाळून, उकळून प्यावे, बाहेरचे खाणो, पावसात भिजणो टाळावे.
पावसाळ्यात शरीरातील अगAी मंदावतो, त्यामुळे अन्न पचविण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे पोटावर ताण येईल, असे पदार्थ एकदम खाणो टाळावे. याउलट थोडे-थोडे आणि काही-काही वेळाने खावे. प्रामुख्याने आंबट, आंबवलेले, पचण्यास जड असलेले जसे मांसाहार, तळलेले पदार्थ, उघडय़ावरचे पदार्थ खाऊ नयेत.
- डॉ. रवींद्र खाडिलकर, आयुर्वेदाचार्य
ऋतू बदलला आहारही बदला
4उन्हाळा ऋतू बदलून आता पावसाळी ऋतू आला आहे, त्यामुळे उन्हाळी आहार बदलून आता पावसाळी आहार घेण्याकडे वळायला हवे, याला ‘ऋतू संधी’ म्हणतात. उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात घेत असलेली सरबते, थंडपेये हळूहळू कमी करून गरम पदार्थ म्हणजेच सूप, कुळथाचे वरण आदी पचायला सोपे व हलके पदार्थ घेण्यास सुरूवात करावी. याचबरोबर उष्ण व तिष्ण असलेले सुंठ, तुळस, काळी मिरी, तमालपत्र, लवंग या पदार्थाचा वापर आहारात वाढवावा, असा सल्ला डॉ. रवींद्र खाडिलकर यांनी दिला.
राहा तुळशीच्या सान्निध्यात
4डेंगीची साथ पुण्यात झपाटय़ाने वाढू लागली आहे. त्यापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने घराजवळ तुळशीचे झाड लावले पाहिजे. तुळस 24 तास ऑक्सिजन सोडत असल्यामुळे त्याच्या सान्निध्यात राहणा:यांना ऑक्सिजनचा पुरवठा होऊन रक्ताभिसरण वाढेल आणि डेंगी आजार होण्यासाठी प्रतिबंध होईल, अशी माहिती डॉ. रवींद्र खाडिलकर यांनी दिली.
सर्दी-खोकला घालवा काढा पिऊन
4सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यांना घरच्या घरी या आजारांना प्रतिबंध करता येऊ शकतो. बेल, तुळस, काळी मिरी, लवंग, दालचिनी, सुंठ ठेचून रात्रभर 4 कप पाण्यात ठेवा. सकाळी हे पाणी उकळून त्याचा एक कप करा आणि त्यात गूळ घालून गरम-गरम प्या. यामुळे सर्दी-खोकला कमी होऊन दिवसभर उत्साह टिकून राहील, असा सल्ला डॉ. रवींद्र खाडिलकर यांनी दिला.
हे करा..
4पाणी गाळून, उकळून प्या
4बाहेरचे, उघडय़ावरचे, तळलेले पदार्थ खाऊ नका
4आंबट, आंबवलेले पदार्थ खाऊ नका
4पावसात भिजू नका, केस ओले ठेवू नका
4भिजलेले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नका
4पचायला जड जाणारे पदार्थ खाऊ नका
4पालेभाज्या खाऊ नये