ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १६ - 'इसिस' या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यातील कोंढवा परिसरातून ५ तरूणांना एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) ताब्यात घेतले आहे. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास एटीएस अधिका-यांनी ही कारवाई केली.
पुण्यात कोंढवा परिसरातील कसूर बैत येथील अमिन व्हिला येथून अधिका-यांनी या पाच तरूणांना ताब्यात घेतले असून ते इसिसशी संबंधित असल्याचा संशय आहे.
सविस्तर माहिती लवकरच..