शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

Kasba Chinchwad Assembly Bypoll Results Live: चिंचवडमध्ये भाजप १०,००० मतांनी आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 7:45 AM

कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत.

02 Mar, 23 02:47 PM

आमदार रवींद्र धंगेकरांना दिलं विजयाचं प्रमाणपत्र

02 Mar, 23 02:26 PM

अश्विनी जगताप यांनी घेतली १० हजारांची आघाडी

चिंचवड पोटनिवडणुकीत २१ व्या फेरीनंतर भाजपाच्या अश्विनी जगताप यांना ७४,४०२ मते, नाना काटे यांना ६४,१५१ मते तर राहुल कलाटे यांना २७,२०० मते मिळाली असून या निवडणुकीत बंडखोरीचा फटका राष्ट्रवादीला बसताना दिसत आहे. जगताप यांची १० हजार मतांची आघाडी कायम आहे.  
 

02 Mar, 23 12:07 PM

कसब्यात काँग्रेस उमेदवाराचा दणदणीत विजय

कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. याठिकाणी भाजपाला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे ११ हजार ४० मतांनी विजयी झाले आहेत. धंगेकरांना ७२,५९९ मते मिळाली तर भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांना ६१,७७१ मते मिळाली

02 Mar, 23 11:56 AM

१८ व्या फेरीनंतर धंगेकर यांची ९ हजार मतांची आघाडी

कसब्यात १८ व्या फेरीची मतमोजणी पूर्ण, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असून ते ९ हजार ४९ मतांनी ते आघाडीवर आहेत. तर आता केवळ २ फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे. धंगेकर यांच्या विजयाची औपचारिकता बाकी असून काँग्रेससह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे.  

02 Mar, 23 11:50 AM

निवडणुकीचा निकाल धक्कादायक - भाजपा उमेदवार हेमंत रासने

कसबा मतदारसंघात दरवेळी तिरंगी लढत व्हायची यंदा पहिल्यांदाच दोन जणांमध्ये थेट लढत झाली. मतदारांपर्यंत पोहचण्यात मी अपयशी ठरलो. मला या निवडणुकीच्या निकालाचं आत्मचिंतन करून कुठे कमी पडलो हे पाहावे लागेल. कुठलीही निवडणूक नेते गांभीर्याने घेत असतात. निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे, जिथे आम्ही कमी पडलो तिथे काम करू अशी प्रतिक्रिया भाजपा उमेदवार हेमंत रासने यांनी दिली. 

02 Mar, 23 11:31 AM

कसब्यात रवींद्र धंगेकरांची ६ हजार मतांनी आघाडी

कसबा निवडणुकीत आतापर्यंत १५ फेऱ्या पार पडल्या असून रवींद्र धंगेकर यांना ५६ हजार ४९७ मते तर भाजपाचे हेमंत रासने यांना ५० हजार ४९० मते मिळाली आहेत. रवींद्र धंगेकर सातत्याने आघाडीवर असून या मतदारसंघात भाजपाला धक्का बसण्याची शक्यता आहे. 

02 Mar, 23 11:16 AM

चिंचवडमध्ये बंडखोरीचा राष्ट्रवादीला बसला फटका

चिंचवड पोटनिवडणुकीत १० व्या फेरीनंतर भाजपाच्या अश्विनी जगताप यांना ३५ हजार ९३७, नाना काटे २८ हजार ५११ तर राहूल कलाटेंना ११ हजार ४२९ मते मिळाली. चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना बसल्याचे दिसत आहे. 

02 Mar, 23 11:11 AM

तेराव्या फेरीनंतरही रवींद्र धंगेकर यांचे मताधिक्य वाढले

कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का बसण्याची शक्यता आहे. तेराव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर यांना ४८,९८६ तर भाजपाचे हेमंत रासने यांना ४४,१६५ मते मिळाली. या फेरीनंतर रवींद्र धंगेकरांची आघाडी वाढली आहे. 

02 Mar, 23 10:58 AM

कसब्यात रवींद्र धंगेकर ५ हजार मतांनी आघाडीवर

कसबा पोटनिवडणुकीत १२ व्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे ५ हजार २०० मतांनी आघाडीवर आहेत. 

02 Mar, 23 10:56 AM

कसब्यात ११ व्या फेरीची मतमोजणी पूर्ण, धंगेकर आघाडीवर

कसबा पोटनिवडणुकीत अकराव्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ४१,२११ मते तर भाजपाचे हेमंत रासने यांना ३७,९४१ मते मिळाली आहेत. 

02 Mar, 23 10:48 AM

१० व्या फेरीनंतर रवींद्र धंगेकरांची आघाडी कायम

कसब्यात नवव्या फेरीनंतर धंगेकरांनी मोठी आघाडी घेतली. नवव्या फेरीत धंगेकरांनी ४ हजार ७०० मतांची आघाडी घेतली होती. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. तिथे पहिल्या फेरीपासून रविंद्र धंगेकर आघाडीवर असल्याचे दिसत आहेत. 

02 Mar, 23 10:46 AM

चिंचवडमध्ये ९ व्या फेरीनंतरही भाजपाची आघाडी कायम

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप यांची आघाडी कायम, नवव्या फेरीत अश्विनी जगताप यांना ३६०२, नाना काटे - २७६५, राहुल कलाटे यांना १०५२ मते मिळाली. एकूण मतमोजणीत भाजपाच्या अश्विनी जगताप यांना ४ हजार ९२९ मतांची आघाडी मिळाली आहे. 

02 Mar, 23 10:34 AM

कसब्यात भाजपाचा गड कोसळणार, संजय राऊतांचा दावा

महाविकास आघाडी किती मजबुतीने पुढे जातेय त्याचे कसबा हे ज्वलंत उदाहरण आहे. कसबा भाजपाचा गड होता. त्याठिकाणी शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपा नेहमी जिंकून आली. परंतु आता शिवसेना महाविकास आघाडीचा घटक आहे. त्याचे परिणाम या निकालात पाहायला मिळत आहेत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. 

02 Mar, 23 10:19 AM

आठव्या फेरीनंतर धंगेकर ३,५०० मतांनी आघाडीवर

कसबा पोटनिवडणुकीत पुन्हा चित्र पालटलं, आठव्या फेरीनंतर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर पुन्हा आघाडीवर गेले आहेत. धंगेकर आतापर्यंत ३०,५२७ मते तर भाजपा उमेदवार हेमंत रासने यांना २७,१८७ मते मिळाली आहेत. आठव्या फेरीनंतर ३,५०० मतांनी आघाडीवर आहेत. 

 

02 Mar, 23 10:07 AM

सातव्या फेरीनंतर धंगेकर १२७४ मतांनी आघाडीवर

कसबा पोटनिवडणुकीत सातव्या फेरीत हेमंत रासने यांनी धंगेकरांपेक्षा जास्त मतदान घेतले. आतापर्यंत हेमंत रासने यांना २४६२३, तर रवींद्र धंगेकर २५,८९७ मते मिळाली आहेत. सध्या धंगेकर १२७४ मतांनी आघाडीवर आहेत. 

02 Mar, 23 10:04 AM

चिंचवडमध्ये भाजपाची आघाडी कायम, मविआ पिछाडीवर

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. सहा फेरीनंतर जगताप ३ हजारांहून जास्त मतांनी आघाडीवर आहेत. याठिकाणी जगताप यांना २०,५२९, नाना काटे १७२१० तर राहुल कलाटे ७१४७ मते मिळाली आहेत. 

02 Mar, 23 10:01 AM

कसब्यात मतमोजणी केंद्राजवळ पोलिसांचा बंदोबस्त

कसबा पोटनिवडणुकीत सुरुवातीच्या फेरीपासून रवींद्र धंगेकर आघाडीवर असून आता मतमोजणी केंद्राजवळ कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली आहे. याठिकाणी पोलीस चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  

02 Mar, 23 09:45 AM

पाचव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर यांची आघाडी कायम

कसबा पोटनिवडणुकीत पाचव्या फेरीअखेर ३ हजार मतांनी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली आहे. पाचव्या फेरीत धंगेकर ४१३१ तर रासने यांना २६३९ मते मिळाली आहेत. 

02 Mar, 23 09:38 AM

बिगबॉस फेम अभिजीत बिचकुलेंना केवळ ४ मते

कसबा पोटनिवडणुकीत चर्चेत असलेले बिग बॉस फेम उमेदवार अभिजीत बिचकुले यांना पहिल्या फेरीत ४ मते मिळाली. 

02 Mar, 23 09:36 AM

चौथ्या फेरीअखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर

कसबा पोटनिवडणुकीत चौथ्या फेरी अखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना १४,८९९ मते मिळाली असून भाजपाचे हेमंत रासने यांना १४,३८२ मते मिळाली आहेत. अद्यापही धंगेकर आघाडीवर आहेत. 

02 Mar, 23 09:17 AM

कसब्यात दुसऱ्या फेरीत धंगेकरांची आघाडी कमी झाली

कसब्यात दुसऱ्या फेरीनंतर रवींद्र धंगेकर यांची आघाडी कमी झाली असून १५०० मतांचा फरक आहे. हेमंत रासने यांना ६९६४, रवींद्र धंगेकर ८,६३१ मते मिळाली आहेत.  

02 Mar, 23 09:03 AM

कसब्यात रवींद्र धंगेकर आघाडीवर, अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला मतदान

कसबा पोटनिवडणूक मतदारसंघात कुंभारवाडा, शिंपी आळी, भाई वाडा, पवळे चौक, गावकोस मारुती परिसर या पूर्वेकडील भागात अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाली आहे. पहिल्या फेरीत ज्या १४ मतदान केंद्रावरील मतांची मोजणी झाली तो संपूर्ण भाग काँग्रेसला पाठिंबा देणारा आहे. त्यामुळे या भागात अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला आघाडी मिळाली आहे.

02 Mar, 23 08:58 AM

चिंचवडच्या दुसऱ्या फेरीतही भाजपा आघाडीवर

चिंचवड पोटनिवडणुकीत दुसऱ्या फेरीतही भाजपाच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. ६०० मतांनी जगताप आघाडीवर असून नाना काटे दुसऱ्या नंबरवर आहेत. राहुल कलाटे यांच्यामुळे मतांमध्ये विभागणी

02 Mar, 23 08:53 AM

कसब्यात पहिल्या फेरीत काँग्रेस उमेदवार आघाडीवर

कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे पहिल्या फेरीत २ हजारांच्या मतांनी आघाडीवर आहेत. भाजपा उमेदवार हेमंत रासने याठिकाणी पहिल्या फेरीत पिछाडीवर आहेत.

02 Mar, 23 08:41 AM

चिंचवडमध्ये पहिल्या फेरीत भाजपा आघाडीवर

चिंचवड पोटनिवडणुकीत पहिल्या फेरीत महायुतीच्या अश्विनी जगताप यांना ४०५३, महाविकास आघाडीच्या नाना काटे ३६०५, तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे १२७३ मते मिळाली आहे.  

02 Mar, 23 08:37 AM

चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप आघाडीवर

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली असून उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. पोस्टल मतमोजणीनंतर आता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली असून चिंचवडमधून पहिला कल हाती आला आहे. भाजपाच्या अश्विनी जगताप यांनी ३४९ मतांनी मतमोजणीत आघाडी घेतली आहे. 

02 Mar, 23 08:29 AM

कसब्यातील पोस्टल मतमोजणीत रवींद्र धंगेकर आघाडीवर

कसबा पोटनिवडणुकीच्या पोस्टल मतदानाला सुरुवात झाली असून यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे आघाडीवर आहेत. भाजपाचे उमेदवार हेमंत रासने पिछाडीवर आहेत. 

02 Mar, 23 08:27 AM

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त

कसबा पोटनिवडणुकीसाठी भारतीय खाद्य निगमच्या कोरेगाव पार्क येथील गोदामात पोलिस बंदोबस्तात मतमोजणी सुरू.  १०० मीटर अलीकडेच रस्ते बंद, वाहनांना मनाई

02 Mar, 23 08:14 AM

निवडणूक निकालापूर्वीच विजयाचे दावे-प्रतिदावे

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजपा आणि महाविकास आघाडीने विजयाचे व अभिनंदनाचे फ्लेक्स लावले आहेत. शहरात फ्लेक्सवॉर सुरू झाले आहे. विजयाचे दावे आणि प्रतिदावे सुरू झाले आहेत. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असले तरी निकालाची उत्सुकता लागली आहे. विविध वाहिन्या, सोशल मीडियावर विजयाचे दावे केले आहेत. महायुती कार्यकर्त्यांनी पंचवीस ते चाळीस हजारांच्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीने पंधरा हजारांच्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा दावा केला. त्यासोबतच अपक्षाच्या समर्थकांनी आम्हीच जायंट किलर होणार असल्याचा दावा केला आहे.

02 Mar, 23 08:13 AM

चिंचवडमध्ये पोस्टल मतमोजणीत अश्विनी जगताप पुढे

चिंचवड पोटनिवडणुकीत पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून त्यात सध्या अश्विनी जगताप आघाडीवर असल्याचं सांगितले जात आहे. 

02 Mar, 23 08:04 AM

मतमोजणीसाठी प्रत्येक फेरीला १५-२० मिनिटे लागणार

या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाच्या एका फेरीसाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागणार आहे.

टॅग्स :chinchwad-acचिंचवडkasba-peth-acकसबा पेठBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी