शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

लाचखोरी उघडकीस आणण्यात पुणे आघाडीवर

By admin | Published: December 09, 2015 12:28 AM

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय नोकरदारांकडून होणाऱ्या लाचखोरीविरोधात केलेल्या जनजागृतीचा सर्वाधिक परिणाम पुणे विभागात झाला असून

पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय नोकरदारांकडून होणाऱ्या लाचखोरीविरोधात केलेल्या जनजागृतीचा सर्वाधिक परिणाम पुणे विभागात झाला असून, ही लाचखोरी रोखण्यात पुणे आघाडीवर राहिले आहे़ या वर्षभरात सर्वाधिक २०६ सापळा केस पुणे विभागाने यशस्वी केल्या आहेत़ राज्यभरात १ जानेवारी ते ७ डिसेंबर २०१५ दरम्यान १ हजार १४८ सापळा केस करण्यात आल्या़ त्यात सर्वाधिक २०६ सापळा केस पुणे विभागाने केल्या आहेत़ त्याखालोखाल नाशिक १७७, औरंगाबाद १६७ आणि नागपूर विभागाने १६४ केस केल्या आहेत़ राज्यात महसूल विभागात सर्वाधिक २८३ सापळा केस करण्यात आल्या़ त्याखालोखाल २५६ केस पोलीस खात्यात झाल्या असून, पंचायत समितीमध्ये १२७, महापालिकांमध्ये ६८ केस करण्यात आल्या आहेत़ पुणे विभागाने सापळा केस करण्यात आघाडी घेण्याबरोबरच तब्बल १०२ प्रकरणांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करून इतर विभागांपेक्षा सरस कामगिरी केली आहे़ सध्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख असताना त्यांनी या विभागाला खऱ्या अर्थाने गती दिली़ लाचखोरी करणाऱ्यांविरोधात त्यांनी मोहीमच उघडली़ शासकीय असूनही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संकेतस्थळ यांनी अद्ययावत केले़ लाचखोरीविषयी लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी १,०६४ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केला़ आणि त्यावर येणाऱ्या सर्व तक्रारींची शहानिशा करून त्यावर योग्य ती कारवाई होत आहे, याकडे लक्ष दिले़ अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले, तरी त्यांच्यावर खटला दाखल करण्यापूर्वी शासनाची परवानगी आवश्यक असते़ अनेकदा ही परवानगी वर्षानुवर्षे मिळत नाही़ ज्या विभागाने अशा खटल्यांना परवानगी देण्यास ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस वेळ लावला, त्या विभागाची माहितीच संकेतस्थळावर टाकण्यास सुरुवात केली़ परिणामी अनेक विभागांमध्ये पडून राहिलेल्या कागदपत्रांवर सह्या होऊ लागल्या़ पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अर्जुन सकुंडे म्हणाले, ‘‘आम्ही लाचखोरीविरोधात जनजागृती, प्रबोधन यांवर भर दिला होता़ लोकांच्या मानसिकतेत बदल करण्याचा प्रयत्न केला़ त्यावर लोकांनी विश्वास दाखवून केलेल्या तक्रारीला आमच्या विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला़ त्यामुळे राज्यात सर्वाधिक कारवाया आम्ही करू शकलो़ पुण्यात १,०६४ आणि ई-मेलद्वारे अधिक तक्रारी आल्या़’’ (प्रतिनिधी)लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई १ जानेवारी ते ७ डिसेंबर २०१५परिक्षेत्रसापळाअपसंपदाअन्य भ्रष्टाचारएकूणमुंबई६१६३७०ठाणे१३४६२१४२पुणे२०६२१२०९नाशिक१७७५-१८२नागपूर१६४८-१७२अमरावती१२७२-१२९औरंगाबाद१६७१२१७१नांदेड११२१२११५एकूण११४८३२१०११९०