ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 31 - चिंचवडजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुणे-लोणावळा रेल्वे वाहतूक यामुळे खोळंबली आहे. तब्बल एक तास उशीराने वाहतूक सुरू आहे. सकाळी 6.20 मिनिटांनी ही घटना लक्षात आल्यानंतर अनेक एक्सप्रेस तात्काळ थांबवण्यात आल्या आहेत. दरम्यान, यामुळे मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
सकाळी 6.20 मिनिटांनी हा बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर खबरदारी म्हणून तात्काळ अनेक एक्स्प्रेस थांबवण्यात आल्या. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणा-या सर्व एक्स्प्रेसही रखडल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे
सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्सप्रेस या बिघाडामुळे खोळंबल्या आहेत.
सध्या युद्धपातळीवर रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र वाहतूक पूर्वपदावर येण्यास किती वेळ लागेल याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.