बारावी निकाल : फर्ग्युसन, मॉर्डन, स. प. महाविद्यालयाची बाजीपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना रोख रक्कमेचे पारितोषिक देऊन गौरविले जाते. यंदा 23 पुरस्कारांपैकी १० पुरस्कार पुण्याच्या विद्यार्थ्यांनी पटकावले असून त्यात प्रामुख्याने फर्ग्युसन, मॉर्डन, स. प. महाविद्यालय, एसएनडीटी आदी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.राज्य शिक्षण मंडाळाच्या बारावीच्या परीक्षेत विविध विषयात प्रथम क्रमांक पटकवावणार्या विद्यार्थ्यांना विविध देणगी दारांकडून सुमारे पाचशे ते एक हजार रुपये रोख रक्कमेचे पारितोषिक दिले जाते. त्यात पुणे विभागातील पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ातील विद्यार्थ्यांना एकूण २३ पारितोषिक दिले जाणार होते. त्यात फर्ग्युसन महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले आहे. फर्ग्युसनच्या ज्ञानदा जोशी हिने पीसीएम ग्रुपमध्ये प्रथम तर तन्मय खरे याने रसायनशास्त्रात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तसेच आदिती हेबाळकर हिने इंग्रजी विषयात आणि अंजनी बॅरेट हिने फ्रेंच विषयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. मॉर्डन महाविद्यालयाच्या चैतन्य टप्पू याने संगणकशास्त्र विषयात प्रथम क्रमांक पटकवला आहे.जपानी भाषा विषयात आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या श्रेयस अत्रे याने प्रथम तर स. प.महाविद्यालयाच्या समृध्दा चंद्रचूड हिने दुसरा क्रमांक मिळविला आहे. तसेच एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्सच्या निधी अगरवाल हिने गृहशास्त्र बालसंगोपन विषयात प्रथम क्रमांक पटकविला आहे. नारायणगावच्या गुरूवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरमधील पूजा जठार हिने मराठी विषयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. चिंचवड येथील नम्रता द्विवेदी हिने भूगोल विषयात प्रथम क्रमांक पटकावला असून ५ हजार ७०० रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे.अहमदनगर जिल्ातील रेसिडेन्शिअल कनिष्ठ महाविद्यालयातील अक्षता गोरे ही भौतिकशास्त्र विषयात प्रथम आली. श्रीरामपूर येथील आर. बी. नारायणराव बोरावके महाविद्यालयाच्या स्नेहल बारहाते ही जीवशास्त्र विषयात प्रथम तर दौंड येथील सेंट सॅबेस्टियन कनिष्ठ महाविद्यालयाच्या नैना देवरा हिने संगणकशास्त्र विषयात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.चौकट सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयातील तुषार सरदेशमुख याने बारावीत एकूण ९६.१४ टक्के गुण मिळवत गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळविले आहेत. त्यामुळे त्याला यंदा शिक्षण मंडळाकडील देणगीदारांकडून दिले जाणारे एकूण ३ हजार ९०० रुपये रक्केमेचे चार विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
पुरस्कारांवर पुण्याच्या विद्यार्थ्यांची छाप
By admin | Published: June 10, 2014 10:41 PM