शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

पुण्यातील शिक्षकाचा प्रताप, पुत्रप्राप्तीसाठी 19 वर्षाच्या तरुणीचं अपहरण करून केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 10:56 AM

जिल्हा परिषदेच्या शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाला सांगवी पोलिसांनी सोमवारी अटक केली.

पुणे-  जिल्हा परिषदेच्या शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाला सांगवी पोलिसांनी सोमवारी अटक केली. मार्च महिन्यात एका 19 वर्षीय तरुणीचं अपहरण करून तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याच्या आरोपात या शिक्षेकाला अटक करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.या शिक्षकाचं पहिलं लग्न झालं असून त्याला एक 14 वर्षीय मुलगी आहे. पण मुलगा हवा या इच्छेपोटी शिक्षकाने एका 19 वर्षाच्या तरुणीचं अपहरण करुन त्याच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. अपहरण झालेल्या मुलीचे आई-वडील आरोपी शिक्षिकेच्या कृत्यात सहभागी होते. डोक्यावरील कर्ज फेडलं जातं आहे म्हणून मुलीला तिच्याशी लग्न करू द्यावं, असा त्यांचा विचार होता. 

सांगवी पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांना अटक केली आहे. तसंच आरोपी शिक्षकाच्या पत्नीला अटक केली आहे. पीडित तरुणीचं अपहरण करून तिला सुरूवातीला येरमाळा येथे ठेवण्यात आलं होतं. तेथून स्वतःला वाचविण्यासाठी तरुणीने घडलेला सर्व प्रकार मोबाइलवर रेकॉर्ड करुन त्याची व्हिडीओ क्लिप तयार केली व स्थानिक पोलिसांना पाठविली. पोलिसांनी या व्हिडीओ क्लिपद्वारे तरुणीला वाचविलं. पोलिसांच्या मदतीनंतर ती तरुणी आई-वडिलांच्या घरी गेली. पण तिथे आई-वडिलांनी तिला मदत न करता पुन्हा शिक्षकाच्या घरी जायला सांगितलं. अखेरीस 20 एप्रिल रोजी या तरूणीने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, या प्रकरणी शिक्षक व इतर 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, शिक्षकाच्या कुटुंबीयांना मुलगा हवा होता.त्यासाठी त्याने दुसरं लग्न करावं अशी त्यांची इच्छा होती. शिक्षकासाठी मुलगी शोधताना त्यांचा पीडित तरूणीच्या घरच्यांशी संपर्क झाला. त्यानंतर शिक्षकाने तरुणीच्या आई-वडिलांच्या डोक्यावर असलेलं 5 लाख रुपयांचं कर्ज फेडू व नवं घर खरेदी करून देऊ असं आमिष तिच्या आई-वडिलांना दाखविलं. व त्यासाठी मुलीशी लग्न लावून देण्याची अट त्या शिक्षकाने घातली. दरम्यान पोलिसांनी आरोपीला, 366, 384, 385 कलमांतर्गत अटक केली आहे.