शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

सुरळीत वाहतुकीसाठी पुणेकर हायकोर्टात

By admin | Published: July 29, 2015 2:54 AM

पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी व वाहतुकीचे नियम गांभीर्याने पाळले जावेत यासाठी पुणे वाहतूक पोलिसांना अत्याधुनिक तंत्रज्ञान द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका

मुंबई : पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी व वाहतुकीचे नियम गांभीर्याने पाळले जावेत यासाठी पुणे वाहतूक पोलिसांना अत्याधुनिक तंत्रज्ञान द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. अनिल मेनन यांनी पुणे वाहतूक पोलीस विभागातील मनुष्यबळाची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.किशोर मनसुखानी व इतरांनी ही याचिका केली आहे. ट्राफिक जंक्शनच्या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी. वाहतूक नियमांची अधिक सक्षमतेने अंमलबजावणी करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांना गॅझेटसह अत्याधुनिक यंत्रे द्यावीत. तसेच वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर नजर ठेवून त्यांना दंड करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.महत्त्वाचे म्हणजे २०१०मध्ये पुणे शहरात झालेल्या रस्ते अपघाताचा तपशीलही याचिकेत देण्यात आला आहे. त्यानुसार २०१०मध्ये तेथे २ हजार अपघात झाले. त्यात ४३९ जणांचा बळी गेला. याचा अर्थ १०० अपघातांमागे २२ जणांचा जीव जातो. याची टक्केवारी मुंंबईत २.२, कोची येथे ९.३ तर इंदौर येथे ८.३ अशी आहे. या अपघातांची वाहतूक विभागाने गंभीर दखल घ्यायला हवी, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.या याचिकेत पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांना प्रतिवादी करा, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले आहे.